महेश मांजरेकरांची थोरली लेक आहे खूप ग्लॅमरस, झळकलीय 'दबंग ३' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 06:00 IST2021-07-03T06:00:00+5:302021-07-03T06:00:00+5:30

महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

Mahesh Manjrekar's daughter is very glamorous in the glamorous 'Dabangg 3' movie | महेश मांजरेकरांची थोरली लेक आहे खूप ग्लॅमरस, झळकलीय 'दबंग ३' चित्रपटात

महेश मांजरेकरांची थोरली लेक आहे खूप ग्लॅमरस, झळकलीय 'दबंग ३' चित्रपटात

महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी सर्वांनाच ठावूक आहे. मात्र त्यांच्या पर्सनल लाइफबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर हीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या दोघांना सई, अश्वमी आणि सत्या या तीन मुलांव्यतिरिक्त आणखी एक मुलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले. त्यातील सई मांजरेकर हिने दबंग ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'दबंग 3' चित्रपटानंतर सईलाही सिनेइंडस्ट्रीत एक वेगळी ओळख मिळाली आहे. सई सोशल मीडियावरही सक्रीय असून बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सई मांजरेकर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 


 सई मांजरेकरला आधीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. मात्र एक वेळ अशी होती की, त्यावेळी ती वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कन्फ्यूज होत असल्याचे तिने सांगितले. एक वेळ असा आला होता ज्यावेळी मी न्यूरोसाइंटिस्ट पासून सुमो रेसरल पर्यंत सगळे काही मला बनायचे होते.

मात्र अखेर दबंग ३ मधून करिअरचा श्रीगणेशा केला. दबंग ३ चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.


सई मांजरेकर दबंग ३ चित्रपटानंतर सलमान खानचा जावई आयुष शर्मासोबत ‘मांझा’ या गाण्यात पहायला मिळाली. या गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. त्यानंतर आता ती मेजर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Mahesh Manjrekar's daughter is very glamorous in the glamorous 'Dabangg 3' movie