लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:26 IST2025-09-25T14:24:25+5:302025-09-25T14:26:23+5:30
कशी आहे राहाची व्हॅनिटी व्हॅन? महेश भट म्हणाले...

लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कारणांवरुन वाद सुरु आहे. दीपिका पादुकोणवर अनप्रोशनल अभिनेत्री असल्याचा आरोप झाला. तिने ८ तासांची शिफ्ट, भरघोस मानधन अशा मागण्या केल्याने तिला दोन बिग बजेट सिनेमातून काढून टाकण्यात आलं. तसंच इंडस्ट्रीतील अनेक कलाकार एक, दोन नाही तर ६ व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात असाही खुलासा काही निर्मात्यांनी केला. कलाकारच नाही तर आता त्यांच्या चिमुकल्या मुलांसाठीही व्हॅनिटी व्हॅन असते. आलिया भटची लेक राहा कपूरला वेगळी व्हॅनिटी व्हॅन आहे असं महेश भट नुकतंच एका मुलाखतीत म्हणाले.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'शी बोलताना महेश भट यांनी खुलासा केला. त्यांनी अमिताभ बच्चन आणि आलियासोबत एक जाहिरात शूट केली. तेव्हा जाहिरातीच्या सेटवर आलियासोबत राहा सुद्धा आली होती. महेश भट्ट म्हणाले, "आलिया घर, संसार, करिअर सगळं छान सांभाळते. नुकतीच ती एका ब्रँडच्या इव्हेंटसाठी मिलानमध्ये गेली होती. तिच्यासोबत राहा सुद्धा होती. मी आताच मिस्टर बच्चन यांच्यासोबत एक जाहिरात शूट केली.आलियाही त्यात होती. तिथे मी पाहिलं की राहाची वेगळी व्हॅनिटी आहे."
आलिया मला म्हणाली, बाबा, तुम्ही राहाच्या व्हॅनिटीत जाऊन का नाही बसत?' पण मला असं वाटलं की मी तिथे जाऊन उगाच तिची सुंदर व्हॅनिटी खराब होईल. राहाची व्हॅनिटी अगदी नर्सरी स्कूलसारखीच होती. अगदी मंदिरासारखीच पवित्र होती. मी आलियाला म्हणालो नको, नको माझ्या म्हाताऱ्याची तिथे जागा नाही. पण याच नवीन पिढीच्या अभिनेत्री आहेत. त्या कामावर जाता, मुलांना वाढवतात, ब्रँड इव्हेंट्सला मुलांना सोबत घेऊन जातात."
महेश भट यांची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. क्युट राहाची व्हॅनिटीही तिच्यासारखीच सुंदर आहे. मात्र इंडस्ट्रीत कलाकारांच्या मागण्या वाढतच चालल्याचं चित्रही दिसत आहे. याआधी आणिर खाननेही कलाकारांच्या या मागण्यांवरुन चिंता व्यक्त केली होती.