महेश बाबूसाठी त्याचा मॅडम तुसादमधील वॅक्स स्टॅच्यू या कारणामुळे आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 06:00 IST2019-03-30T06:00:00+5:302019-03-30T06:00:00+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा सिंगापूरमधील मॅडम तुसादमध्ये वॅक्स पुतळा बनवण्यात आला आहे.

For Mahesh Babu, he has a Wax Statue in Madame Tussauds | महेश बाबूसाठी त्याचा मॅडम तुसादमधील वॅक्स स्टॅच्यू या कारणामुळे आहे खास

महेश बाबूसाठी त्याचा मॅडम तुसादमधील वॅक्स स्टॅच्यू या कारणामुळे आहे खास

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचा सिंगापूरमधील मॅडम तुसादमध्ये वॅक्स पुतळा बनवण्यात आला आहे. महेश बाबूच्या चाहत्यांची संख्या लक्षात घेऊन सुपरप्लेक्स एएमबी सिनेमागृहात महेश बाबूची मॅडम तुसाद वैक्स प्रतिमा लाँच केली. उत्कृष्ट प्रतिमा स्वीकारताना महेश बाबूने आपल्या पुतळ्याचे महत्त्व स्पष्ट केले.

महेश बाबूसाठीच नव्हे तर मॅडम तुसाद सिंगापूरसाठी ही मूर्ती खूप खास आहे. कारण सिंगापूरच्या बाहेर पहिल्यांदाच एक प्रतिष्ठित पुतळ्याचे अनावरण केले आहे. या पुतळ्याबद्दल महेश बाबू म्हणाला की, हा मेणाचा पुतळा एकप्रकारे माझ्या यशाचा भाग आहे आणि माझ्यासाठी हा सन्मान आहे. 

महेश बाबूच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर हा पुतळा सिंगापूरमधील मॅडम तुसादमध्ये ठेवण्यात आला. त्याच्या सर्व चाहत्यांना सुपरस्टार महेशच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढायची संधी मिळणार आहे. महेश बाबू ने स्वतः ही आपल्या पुतळ्यासोबत सेल्फी काढला. 


महेश बाबूचा आगामी चित्रपट 'महर्षी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्याच्या कारकीर्दीतील हा २५वा चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर त्याच्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित करण्यात आला. या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 

Web Title: For Mahesh Babu, he has a Wax Statue in Madame Tussauds