नम्रता शिरोडकरच्या लेकीचं होतंय कौतुक, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली सितारा; बघा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 09:51 IST2023-07-05T09:49:50+5:302023-07-05T09:51:03+5:30

सितारा साऊथमधली सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे.

mahesh babu and namrata shirodkar daughter sitara on new york times square became pnj brand ambessador | नम्रता शिरोडकरच्या लेकीचं होतंय कौतुक, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली सितारा; बघा Video

नम्रता शिरोडकरच्या लेकीचं होतंय कौतुक, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली सितारा; बघा Video

साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आणि मराठमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar)यांची लाडकी लेक सितारा (Sitara Ghattamaneni) हिचं सध्या खूप कौतुक होतंय. सितारा केवळ ११ वर्षांची असून खूपच टॅलेंटेड आहे. तिचे डान्सचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. आता ती नुकतीच थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकली आहे. एका प्रतिष्ठित ज्वेलरी ब्रँडचा ती चेहरा बनली आहे. महेश बाबू यांनी स्वत: पोस्ट करत लेकीचं कौतुक केलं आहे. 

महेश बाबू यांनी लेकीचे फोटो शेअर करत लिहिले, 'टाईम्स स्क्वेअर प्रकाशमय झालंय. माझी फायर क्रॅकर...तुझा खूप अभिमान वाटतो. अशीच चमकत राहा.' तर सिताराची आई अभिनेत्री नम्रता शिरोडकरनेही लेकीचं कौतुक करत पोस्ट शेअर केली. सितारा साऊथमधली सर्वात लोकप्रिय स्टारकिड आहे. शिवाय तिचा साधेपणा नेहमीच सर्वांना भावतो. अनेकदा ती आईसोबत मराठीतही बोलताना दिसते. 

सिताराचं वय सध्या फक्त ११ वर्ष आहे मात्र आत्ताच तिने लोकप्रियतेचे शिखर गाठलं आहे. अर्थात ती सुपरस्टार महेश बाबूची लेक आहे याचाही कुठेतरी तिला फायदा झालाय. तिचे इन्स्टाग्रामवर 1.2 मिलिअन फॉलोअर्स आहेत. सितारा अनेकदा मॉडेलिंग, रॅम्प वॉक करतानाही दिसते. तसंच आता टाईम्स स्क्वेअरवर झळकल्याने तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.

Web Title: mahesh babu and namrata shirodkar daughter sitara on new york times square became pnj brand ambessador