४० कोटींचं बजेट आणि १६ दिवसांत १४५ कोटींची कमाई! बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय 'हा' अॅनिमेटेड सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 13:16 IST2025-08-10T13:15:16+5:302025-08-10T13:16:28+5:30
सध्या बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. भल्याभल्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना या सिनेमाने धूळ चारली आहे. ना कोणता हिरो, ना हिरोईन, ना कोणताही मोठा सुपरस्टार...तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे.

४० कोटींचं बजेट आणि १६ दिवसांत १४५ कोटींची कमाई! बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय 'हा' अॅनिमेटेड सिनेमा
सध्या बॉक्स ऑफिसवर एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. भल्याभल्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना या सिनेमाने धूळ चारली आहे. ना कोणता हिरो, ना हिरोईन, ना कोणताही मोठा सुपरस्टार...तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. पूर्णपणे अॅनिमेटेड असलेल्या 'महावतार नरसिम्हा' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर डरकाळी फोडली आहे. या सिनेमाने ४० कोटींचं बजेट पहिल्याच आठवड्यात वसूल केलं आहे. दोन आठवड्यांनंतरही 'महावतार नरसिम्हा'ची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे.
भक्त प्रल्हादाची असिम भक्ती आणि त्याचं रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर नरसिम्हाचा अवतार घेऊन अवतरलेल्या विष्णू भगवान यांची कथा 'महावतार नरसिम्हा' सिनेमातून दाखविण्यात आली आहे. या अॅनिमेटेड सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेमही मिळत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी या सिनेमाने १.७५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर पहिल्या आठवड्यात ४४.७५ कोटींची कमाई करत सिनेमाचं ४० कोटींचं बजेट वसूल केलं.
'महावतार नरसिम्हा' सिनेमा २५ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आत्तापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. १६ दिवसांत 'महावतार नरसिम्हा'ने १४५ कोटींची कमाई केली आहे. सन ऑफ सरदार २, धडक २ यांसारख्या बिग बजेट बॉलिवूड सिनेमांना 'महावतार नरसिम्हा'ने मागे टाकलं आहे. जिकडेतिकडे फक्त 'महावतार नरसिम्हा'चीच चर्चा आहे.