'महर्षि'च्या ट्रेलरमधला महेश बाबूचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 18:55 IST2019-05-03T18:49:29+5:302019-05-03T18:55:08+5:30
अभिनेता महेश बाबूचा 'महर्षि' सिनेमाचे ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेलरमध्ये महेश बाबू खूपच डॅशिंग अंदाजात दिसतोय. ट्रेलरमध्ये महेश बाबू वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय.

'महर्षि'च्या ट्रेलरमधला महेश बाबूचा लूक पाहून फॅन्स झाले क्रेझी, दिल्या अशा प्रतिक्रिया!
अभिनेता महेश बाबूचा 'महर्षि' सिनेमाचे ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ट्रेलरमध्ये महेश बाबू खूपच डॅशिंग अंदाजात दिसतोय. ट्रेलरमध्ये महेश बाबू वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. तो यात एक कॉलेज विद्यार्थी ऋषीची भूमिका साकारताना दिसणार आहे. महेश बाबू यात एक यशस्वी बिझनेसमन, कॉलेजचा विद्यार्थी आणि शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर पाहुन महेश बाबूची यात दुहेरी भूमिका असल्याचा येतोय. महर्षि शूटिंग पूर्ण करण्यासाठी त्याला जवळपास एक वर्षांचा कालावधी लागला.
ट्रेलरमध्ये महेश बाबूसोबत पूजा हेगडेसुद्धा दिसतेय. पूजा हेगडे यात महेश बाबूच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचे शूटिंग गोवा, देहरादुन आणि अमेरिकेत करण्यात आले आहे. या सिनेमाच्या रिलीजची वाट महेश बाबूचे फॅन्स मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. कारण महेश बाबू गतवर्षी रिलीज झालेल्या नेनू सिनेमात दिसला होता हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यामुळे टीझर रिलीज झाल्यापासून त्याचे फॅन्स या सिनेमाला घेऊन उत्सुक आहेत लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे.
महर्षी हा चित्रपट या सुपरस्टार २५ वा चित्रपट आहे. त्याच्यासाठी हा खूप जवळचा आणि खास प्रोजेक्ट आहे. हा महर्षि ९ मे २०१९ रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाची टक्कर बॉक्स ऑफिसवर 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमाशी होणार आहे. यात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतरिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.