सुंदर डोळे अन् कुरळे केस, अभिनेत्रींसारखी पोझ देताना दिसली मोनालिसा, लवकरच करणार सिनेमात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:27 IST2025-11-05T18:26:45+5:302025-11-05T18:27:24+5:30

Mahakumbh Viral Girl Monalisa : मोनालिसाचा नुकताच नवा लूक समोर आला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

mahakumbh viral girl monalisa spotted in her new look soon she will make debut in films | सुंदर डोळे अन् कुरळे केस, अभिनेत्रींसारखी पोझ देताना दिसली मोनालिसा, लवकरच करणार सिनेमात एन्ट्री

सुंदर डोळे अन् कुरळे केस, अभिनेत्रींसारखी पोझ देताना दिसली मोनालिसा, लवकरच करणार सिनेमात एन्ट्री

आजच्या युगात इंटरनेट ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे कितीतरी लोकांचे नशीब पालटले आहे. नाव, प्रसिद्धी, पैसा... सर्व काही सोशल मीडियाने दिले आहे. याच वर्षी महाकुंभ मेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा आठवत असेलच. आज मोनालिसा भोसले सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. महाकुंभमधून व्हायरल झाल्यानंतर तिचे नशीब असे चमकले की, तिच्यासाठी चित्रपटसृष्टीची दारे उघडली गेली. आता मोनालिसाचा एक नवा लूक समोर आला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

अलिकडेच मोनालिसाचा नवा लूक समोर आला आहे. या लूकमध्ये मोनालिसा कुरळ्या केसांमध्ये दिसत आहे. एथनिक आउटफिटमध्ये दिसणारी मोनालिसा खूप सुंदर दिसत आहे. आपल्या नवीन लूकसोबत मोनालिसाने प्रयोगही केला आहे. या लूकमध्ये मोनालिसाने केवळ पापाराझींना पोझ दिल्या नाहीत, तर चाहत्यांसोबत फोटोही काढले. आता सोशल मीडियावर मोनालिसाच्या या लूकचे कौतुक होत आहे आणि हा व्हिडीओही खूप व्हायरल होत आहे. खरेतर मोनालिसा तिच्या 'लाईफ' नावाच्या चित्रपटाच्या एका कार्यक्रमासाठी हैदराबादला पोहोचली होती, जिथे तिचा हा लूक समोर आला आहे. हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट असेल, ज्यात ती दिसणार आहे.


लवकरच सिनेमात दिसणार मोनालिसा
महाकुंभमध्ये माळा विकून व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब आता पूर्णपणे बदलले आहे. या तेलुगू चित्रपटाव्यतिरिक्त मोनालिसा आणखी काही चित्रपटांमध्येही दिसणार आहे. महाकुंभ २०२५ मध्ये व्हायरल झाल्यानंतर मोनालिसा आपल्या गावी परत गेली होती, पण चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा तिला शोधत घरी पोहोचले आणि त्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली. यानंतर त्यांनी मोनालिसाला अभिनयाच्या प्रशिक्षणासोबतच शिक्षणही दिले. कसे राहायचे, कसे पोज द्यायचे आणि कसा अभिनय करायचा, हे सर्व त्यांनी तिला शिकवले. मोनालिसा सनोज मिश्रा यांच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे शूटिंगही जवळपास पूर्ण झाले आहे. यापूर्वी मोनालिसा एका म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली आहे.
 

Web Title : मोनालिसा का ग्लैमरस मेकओवर: कुंभ मेला से तेलुगु सिनेमा में डेब्यू

Web Summary : कुंभ मेला में वायरल हुई मोनालिसा भोसले ग्लैमरस मेकओवर के बाद तेलुगु सिनेमा में डेब्यू करने के लिए तैयार हैं। निर्देशक सनोज मिश्रा द्वारा खोजी गई, वह 'लाइफ' और 'द डायरी ऑफ मणिपुर' में अभिनय कर रही हैं।

Web Title : Monalisa's glamorous makeover: From Kumbh Mela to Telugu cinema debut.

Web Summary : Viral Kumbh Mela sensation Monalisa Bhosle is set to debut in Telugu cinema after a glamorous makeover. Discovered by director Sanoj Mishra, she's starring in 'Life' and 'The Diary of Manipur', showcasing her transformation from street vendor to actress.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.