महाकुंभातून फेमस झालेल्या मोनालिसाचं नवं गाणं येतंय, शूटिंगचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:49 IST2025-05-18T13:49:00+5:302025-05-18T13:49:13+5:30
महाकुंभातून फेमस झालेली मोनालिसा पुन्हा चर्चेत आली आहे.

महाकुंभातून फेमस झालेल्या मोनालिसाचं नवं गाणं येतंय, शूटिंगचे फोटो आले समोर
Mahakumbh Mela Viral Girl Monalisa: महाकुंभमध्ये आलेल्या एका सुंदर डोळ्यांच्या तरुणीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं. ती तरुणी म्हणजे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेली मोनालिसा. व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाचं नशीब आता फळफळलं आणि तिची थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. ती 'द मणिपूर डायरी' या चित्रपटात झळकणार आहे. पण, या चित्रपटापुर्वी तिचं एक गाणं चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या गाण्याचं शुटिंगही पुर्ण झालं आहे. या गाण्यातील तिचा लूक समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसून येत आहे. मोनलिसाचे सुंदर फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाले आहेत. तिचा हा लूक पाहिल्यावर तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
मोनालिसानं तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओ 'जय महाकाल' चे शूटिंग पूर्ण केलं आहे. या म्युझिकव्हिडीओमध्ये ती अभिनेता उत्कर्ष सिंहसोबत दिसत आहे. मोनालिसाने सोशल मीडियावर शूटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती फुलांचं प्रिंट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसतेय. मोनालिसाच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरपूर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय.
मोनालिसाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहलं, "'जय महाकाल' गाण्याचे शूटिंग पूर्ण झालं असून आम्ही रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहोत. या गाण्याला भरपूर प्रेम द्या", असं आवाहन तिनं पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना केलं आहे.
प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात मोनालिसाचा हार विकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिच्या घाऱ्या डोळ्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. तिची लोकप्रियता इतकी वाढली की तिला मेळा सोडून घरी परतावे लागले. मोनालिसा ही मध्य प्रदेशातील महेश्वरची रहिवासी आहे.