डॉ. श्रीराम नेनेंनी शेअर केला Madhuri Dixit चा विना मेकअप Unseen फोटो; नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 09:21 AM2021-10-08T09:21:11+5:302021-10-08T09:21:46+5:30

Dr. Shriram nene shares Madhuri Dixits Unseen Photo : माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. 

Madhuri Dixits husband Dr Shriram Nene shares unseen pic from their younger days in US | डॉ. श्रीराम नेनेंनी शेअर केला Madhuri Dixit चा विना मेकअप Unseen फोटो; नेटकरी म्हणाले...

डॉ. श्रीराम नेनेंनी शेअर केला Madhuri Dixit चा विना मेकअप Unseen फोटो; नेटकरी म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्दे माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असतात. 

Madhuri Dixits Unseen Photo : ब़ॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे सोशल मीडियावर (Social Media) अतिशय अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते सोशल मीडियावर आपल्या कुटुंबीयांसोबत फोटोही शेअर करताना दिसतात. नुकताच डॉ. श्रीराम नेने यांनी त्यांची पत्नी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सोबत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. दोघंही जेव्हा स्कुबा डायव्हिंग शिकण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाचा फोटो असल्याचंही श्रीराम नेने यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या फोटोमध्ये माधुरी दीक्षित विना मेकअप दिसत आहे. 

फ्लोरिडाच्या गर्मीदरम्यान एका गरम पार्किंग स्पेसमध्ये स्कुबा डाइव्ह शिकण्यासाठी काहीच नाही. वास्तवात पाहता, फ्लोरिडा एक्विफर सुपर क्लिन आहे आणि कायम ७० डिग्रीपर्यंत असतं. काही मिनिटांतच माधुरी 'जॅक्स कॉस्ट्यू'मध्ये कोणत्याही भीतीशिवाय १०० फूट खाली जात होती, असं त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टमध्ये फोटो शेअर करताना म्हटलं आहे.


फोटोमध्ये सिंपल दिसतेय माधुरी
फोटोमध्ये माधुरी दीक्षित अतिशय सिंपल दिसत आहे आणि हा फोटो त्यांच्या यंग एजमधील वाटत आहेय यामध्ये माधुरी आणि श्रीराम नेने हे वेटसूट आणि अन्य गियरसह कॅमेऱ्याकडे पोझ देताना दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिचा हा विना मेकअप असलेला फोटो पाहून आश्चर्य व्यक्त केलं.

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा विवाह १७ ऑक्टोबर १९९९ रोजी झाला होता. त्यांना अरिन आणि रायन नावाची दोन मुलंही आहेत. दोघांमधील बॉन्डींगही अतिशय उत्तम आहे. दोघंही सोशल मीडियावर अतिशय अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपले फोटोही शेअर करताना दिसतात.

Read in English

Web Title: Madhuri Dixits husband Dr Shriram Nene shares unseen pic from their younger days in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.