धक् धक् गर्ल माधुरीच्या सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 18:15 IST2020-04-24T17:46:18+5:302020-04-24T18:15:38+5:30

बॉलिवूडची धक् धक् गर्ल माधुरी दीक्षितने सचिन तेंडुलकरला ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Madhuri dixit wishes sachin tendulkar on his birthday gda | धक् धक् गर्ल माधुरीच्या सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली...

धक् धक् गर्ल माधुरीच्या सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाली...

महान फलंदाज सचिन तेडुलकरचा आज वाढदिवस आहे. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निवृत्त होऊन सहा वर्षांहून अधिक काळ झाला. पण, क्रिकेट चाहत्यांमध्ये त्यानं निर्माण केलेलं स्थान आजही तसेच कायम आहे. तेंडुलकरनं भारतातील चाहत्यांना क्रिकेटच्या प्रेमात पाडलं. सर्वसामान्य ते सेलिब्रेटी सगळेच सचिनचे चाहते आहे. बॉलिवूडची धक् धक् गर्ल माधुरी दीक्षितने सुद्दा सचिन तेंडुलकरला ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'तू नेहमीच सगळ्यांसाठी प्रेरणास्थान आहेस मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.' असे ट्विट माधुरीने केले आहे. सचिनवर सकाळपासून सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे.  


कोरोनाविरुद्धच्या लढाईत योद्ध्याची भूमिका बजावत असलेला दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर हा ४७ वर्षांचा झाला आहे. तथापि यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा त्याने निर्णय घेतला. कोरोना विरोधाच्या लढाईत सचिन तेंडुलकरने मदत केली आहे.  माधुरी दीक्षितनेदेखील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत केली आहे.


माधुरी लवकरच ‘पंचक’ या तिच्या दुसऱ्या सिनेमाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात अंधश्रद्धेवर कॉमिक अंदाजाने भाष्य केले जाणार आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटात मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Madhuri dixit wishes sachin tendulkar on his birthday gda