'डान्स दीवाने ३'च्या चार एपिसोडमध्ये दिसणार नाही माधुरी दीक्षित, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 15:35 IST2021-04-28T15:34:33+5:302021-04-28T15:35:09+5:30

आता धर्मेश आणि राघवनंतर 'डान्स दीवाने ३' शो परिक्षक माधुरी दीक्षितदेखील पुढील चार एपिसोडमध्ये दिसणार नाही.

Madhuri Dixit will not be seen in four episodes of 'Dance Deewane 3', this is the reason behind it | 'डान्स दीवाने ३'च्या चार एपिसोडमध्ये दिसणार नाही माधुरी दीक्षित, हे आहे यामागचं कारण

'डान्स दीवाने ३'च्या चार एपिसोडमध्ये दिसणार नाही माधुरी दीक्षित, हे आहे यामागचं कारण

डान्सिंग रिएलिटी शो डान्स दीवाने ३ सध्या चर्चेत आला आहे. सुरूवातीला या शोमधील १८ लोकांना एकत्र कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर सेटवर हाहाःकार माजला होता. त्यानंतर शोचा परिक्षक धर्मेशला कोरोना व्हायरसची लागण झाली आणि तो काही दिवसांसाठी शोमधून बाहेर होता. नुकतेच शोचा अँकर राघवला देखील कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता काही दिवसांसाठी शोचे सूत्रसंचालन करणार याबद्दल काहीही समजू शकलेले नाही. मात्र आता धर्मेश आणि राघवनंतर शो परिक्षक माधुरी दीक्षितदेखील पुढील चार एपिसोडमध्ये दिसणार नाही. मात्र माधुरी शो सोडत नाही आहे किंवा तिला कुणी रिप्लेसही करत नाही. ती फक्त काही एपिसोडमध्ये दिसणार नाही. कारण आगामी एपिसोडचे शूटिंग बंगळुरूमध्ये होणार आहे.


खरेतर मुंबईत लॉकडाउन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे डान्स दिवाने या रिएलिटी शोचे शूट बंगळुरूमध्ये होणार आहे. मात्र माधुरीने बंगळुरूत जाणार नसल्याचे सांगितले आहे. तिने मुंबईत राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ती आगामी चार भागात दिसणार नाही. मात्र तिच्या जागी अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री नोरा फतेही परिक्षक म्हणून दिसणार आहे.


टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरीला रिप्लेस केले जाणार नाही. ती फक्त चार भागात दिसणार नाही. माधुरी दीक्षितने नुकतेच कोरोनाच्या लशीचा दुसरा डोस घेतला आहे.

तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता, ज्यात ती लस घेताना दिसत होती. फोटो शेअर करून तिने लोकांनाही शक्य होईल तेवढ्या लवकर लस घ्यायला सांगितली आहे.

Web Title: Madhuri Dixit will not be seen in four episodes of 'Dance Deewane 3', this is the reason behind it