'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, असा मिळाला 'धक-धक गर्ल'ला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 19:29 IST2025-05-15T19:28:27+5:302025-05-15T19:29:01+5:30

Tezaab Movie : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचा १९८८ मध्ये रिलीज झालेला 'तेजाब' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले.

Madhuri Dixit was not the first choice for 'Tezaab', this is how 'Dhak Dhak Girl' got the film | 'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, असा मिळाला 'धक-धक गर्ल'ला सिनेमा

'तेजाब'साठी माधुरी दीक्षितला नव्हती पहिली पसंती, असा मिळाला 'धक-धक गर्ल'ला सिनेमा

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा १९८८ मध्ये रिलीज झालेला 'तेजाब' (Tezaab Movie) हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडले. पण तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटात माधुरी दीक्षित निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. निर्मात्यांना मीनाक्षी शेषाद्री(Meenakshi Sheshadri)ला मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करायचे होते. पण तिच्यासोबत मानधनावरून खूप चर्चा झाली आणि शेवटी डील फायनल होऊ शकली नाही.

मीनाक्षी शेषाद्रीने सिनेमा नाकारल्यानंतर निर्मात्यांनी माधुरीला ऑफर केली. त्यावेळी ती इंडस्ट्रीत नवीन होती. त्यावेळी अनिल कपूरलाही माधुरीच्या कामावर शंका होती. पण जेव्हा अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य कलाकार म्हणून काम केलं तर हा सिनेमा हिट ठरला. ५० आठवड्यांपर्यंत चित्रपटाचे शो थिएटरमध्ये सुरू होते. 

अनिल कपूरलाही नव्हती पहिली पसंती

फक्त माधुरी दीक्षितच नाही तर या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी अनिल कपूरही पहिली पसंती नव्हती. निर्मात्यांनी सुरुवातीला आदित्य पंचोलीचे नाव ठरवले होते, परंतु नंतर बोनी कपूर यांच्या हस्तक्षेपामुळे अनिल कपूरला हा चित्रपट मिळाला. म्हणजेच बोनींच्या आग्रहावरून अनिल कपूरला हा चित्रपट मिळाला. जेव्हा निर्मात्यांनी माधुरी दीक्षितच्या आधी मीनाक्षीशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी तिच्याशी बराच वेळ चर्चा केली. परंतु निर्माते मीनाक्षी शेषाद्रीने मागितलेली फी देण्यास तयार नव्हते. फी आणि शूटिंगच्या तारखांबाबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर दिग्दर्शक एन चंद्रा यांनी माधुरी दीक्षितशी संपर्क साधला.

अन् माधुरी बनली स्टार

माधुरी दीक्षित इंडस्ट्रीत नवीन होती आणि प्रत्येक शॉटमध्ये १००% देण्यासाठी ती ओळखली जात असे. माधुरी दीक्षितचे 'एक दो तीन' हे गाणे इतके हिट झाले की ते आजही ऐकायला मिळते. या चित्रपटाने माधुरी दीक्षितला इतके मोठे स्टार बनवले की तिच्या कारकिर्दीचा आलेख वेगाने वर येऊ लागला. हा चित्रपट केल्यानंतर माधुरी दीक्षित परदेशात गेली आणि तिला भारतात काय चालले आहे याची काहीच कल्पना नव्हती. माधुरी दीक्षित परत आली तेव्हा विमानतळावर तिची वाट पाहत असलेली मोठी गर्दी होती. या घटनेवरून माधुरी दीक्षितला समजले की आता तिच्या कारकिर्दीला वेग आला आहे.

Web Title: Madhuri Dixit was not the first choice for 'Tezaab', this is how 'Dhak Dhak Girl' got the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.