महाशिवरात्रीनिमित्त माधुरी दीक्षितचं शिवनृत्य; व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 13:39 IST2024-03-08T13:38:27+5:302024-03-08T13:39:19+5:30

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने महाशिवरात्रीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्रीनिमित्त माधुरीने खास शिवनृत्य केलं आहे.

madhuri dixit shiv nritya dance on mahashivratri actress shared video netizens amazed | महाशिवरात्रीनिमित्त माधुरी दीक्षितचं शिवनृत्य; व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

महाशिवरात्रीनिमित्त माधुरी दीक्षितचं शिवनृत्य; व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

संपूर्ण देशभर महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तगण भगवान शंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करतात. महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. अनेक सेलिब्रिटी शंकर महादेवाचे भक्त आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महाशिवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने महाशिवरात्रीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरी अभिनय आणि सौंदर्याबरोबरच तिच्या नृत्यासाठीही ओळखली जाते. महाशिवरात्रीनिमित्त माधुरीने खास शिवनृत्य केलं आहे. याचा व्हिडिओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत माधुरी भरजरी लेहेंगी घालून शिवनृत्य करताना दिसत आहे. "महाशिवरात्रीच्या दिनी दैवी ऊर्जा अनुभवत आहे...ही रात्र भक्ती, आत्मनिरिक्षण आणि अध्यात्मिक आहे", असं कॅप्शन माधुरीने या व्हिडिओला दिलं आहे. 

माधुरीचं शिवनृत्य पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. माधुरीचं हे शिवनृत्य चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे. 

Web Title: madhuri dixit shiv nritya dance on mahashivratri actress shared video netizens amazed