'देवदास'मधील गाण्यावर 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:04 AM2024-04-12T09:04:08+5:302024-04-12T09:04:43+5:30

इन्स्टाग्राम एखादा रील आला कि तो इतका व्हायरल होतो की अनेकांना त्यावर व्हिडीओ बनविण्याचा मोह आवरत नाही.

Madhuri Dixit Shares Reels On Aishwarya Rai And Shah Rukh Khan Starred Bairi Piya Song In Devdas | 'देवदास'मधील गाण्यावर 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

'देवदास'मधील गाण्यावर 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवते. ९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी माधुरी आजही तितकीच ग्लॅमरस दिसते. अभिनयाबरोबरच माधुरीच्या डान्सचीही चर्चा होते. माधुरी तिच्या डान्सने आजही चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. माधुरीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. माधुरी दीक्षित अनेक ट्रेंडिंग गाण्यांवर रील बनवताना दिसते. आताही माधुरीच्या एका रील व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

माधुरीला देवदासमधील एका गाण्याची भुरळ पडली आहे. तिने रीलवर ट्रेडिंग असलेल्या देवदास सिनेमातील "बैरी पिया" गाण्यातील "बहकी-बहकी बातों में तेरी" या ओळींवर रील व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत माधुरीने पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. इंडो वेस्टर्न लूक करून माधुरीने "बैरी पिया" गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. तिच्या या रील व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.  या व्हिडीओला तिने "ले ही जाएगा तेरा जिया" असं कॅप्शन दिलं आहे. 

सध्या सोशल मीडियावर या गाण्यानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. प्रत्येकजण या गाण्याची हूकस्टेप फॉलो करत व्हिडीओ शेअर करताना दिसून येत आहे. धकधक गर्ल माधुरीच्या या रील व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. माधुरी दीक्षित नेहमीच ट्रेंड फॉलो करताना दिसते. सोशल मीडियावर ट्रेंडिंग व्हिडीओवर ती रील करताना दिसते. सध्या माधुरी डान्स दिवाने या रिएलिटी शोचं परिक्षण करत आहे. ती सोशल मीडियावर सेटवरील व्हिडीओ शेअर करत असते. 
 

Web Title: Madhuri Dixit Shares Reels On Aishwarya Rai And Shah Rukh Khan Starred Bairi Piya Song In Devdas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.