लेट पण थेट! माधुरी दीक्षितने अखेर ट्रेंड फॉलो केलाच, 'एक नंबर तुझी कंबर'वर धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 11:44 IST2025-08-14T11:43:54+5:302025-08-14T11:44:41+5:30
माधुरीच्या या रीलला काही मिनिटातच हजारो लाईक्स मिळाले आहेत.

लेट पण थेट! माधुरी दीक्षितने अखेर ट्रेंड फॉलो केलाच, 'एक नंबर तुझी कंबर'वर धरला ठेका
एव्हरग्रीन ब्युटी माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) जिच्या सौंदर्यावर लाखो फिदा आहेत. माधुरी वयाच्या ५८ व्या वर्षीही अनेकांना घायाळ करते. तिचं हसणं, नृत्य, अभिनय सगळंच खास आहे. नुकतंच माधुरीने संजू राठोडचं व्हायरल गाणं 'एक नंबर तुझी कंबर'वर ठेका धरला. थोडं लेट पण थेट रील तिने केलं. अबोली रंगाच्या साडीत तिने या गाण्यावर डान्स केला. माधुरीच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत. ओजी डान्सिंग क्वीनने या गाण्यावर अखेर रील केलंच.
माधुरी दीक्षित आजही मनोरंजनविश्वात अॅक्टिव्ह आहे. संजू राठोडचं 'गुलाबी साडी' नंतर 'एक नंबर तुझी कंबर' हे गाणं मधल्या काळात ट्रेंडिंगवर होतं. बऱ्याच सेलिब्रिटींनी यावर रील शेअर केले. या गाण्याला युट्यूबवर मिलियन व्ह्जूय मिळाले. तर आता 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितने थोडं लेट का होईना पण या गाण्यावर ठेका धरला आहे. गाण्याच्या हुक स्टेप्स करत तिने हे रील शेअर केलं आहे. सोनेरी काठ असलेली अबोरी रंगाची साडी, मॅचिंग ब्लाऊज, गळ्यात सुंदर हार असा तिचा लूक आहे. चेहऱ्यावर गोड स्माईल आणि कातिल अदा दाखवत माधुरीने रील शेअर केलं आहे. 'व्हाईब्स = शेकी, मूव्ह्ज = अनस्टॉपेबल' असं तिने कॅप्शन दिलं आहे.
माधुरीच्या या रीलला काही मिनिटातच हजारो लाईक्स मिळाले आहेत. 'अखेर तिने ट्रेंड फॉलो केलाच', 'एक नंबर मोहिनी', 'खूप सुंदर', 'दिवा', 'किती क्युट, सुंदर, लाघवी...सगळंच भारी' अशा कमेंट्स चाहत्याने केल्या आहेत.
माधुरी दीक्षितने ८०-९० च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले. मात्र तिच्या नृत्याचं विशेष कौतुक झालं. 'एक दो तीन','धक धक करने लगा','चने के खेत मे' यासारखी अनेक गाणी गाजली.