माधुरी दीक्षित व आमीर खानच्या 'या' चित्रपटाचा येणार सीक्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:04 IST2019-02-12T20:02:17+5:302019-02-12T20:04:05+5:30
नव्वदच्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता आमीर खान यांचा सुपरहिट ठरलेल्या दिल चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे.

माधुरी दीक्षित व आमीर खानच्या 'या' चित्रपटाचा येणार सीक्वल
नव्वदच्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता आमीर खान यांचा सुपरहिट ठरलेल्या दिल चित्रपटाचा सीक्वल लवकरच येणार आहे. माधुरी-आमीरच्या केमिस्ट्रीसोबतच या चित्रपटातली गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. या चित्रपटाचा सीक्वल काढण्याचा मानस दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी बोलून दाखवला आहे.
‘टोटल धमाल’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलचा सीक्वल बनवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सीक्वलचे नाव ‘दिल अगेन’ असेल असेही ते म्हणाले.
चित्रपटाची कथा अजून निश्चित झाली नाही मात्र चित्रपटाचा सीक्वल नक्की येईल असे सांगत त्यांनी चाहत्यांना दिलासा दिला आहे. या चित्रपटात माधुरी आमीर ही जोडी पुन्हा पाहायला मिळणार की नवीन जोडी हे अद्याप समजू शकलेले नाही. या चित्रपटाचा तेलगू, कन्नड भाषेत रिमेकही करण्यात आला होता. या दोन्ही भाषेतील चित्रपटांनादेखील तेवढाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. दिलच्या सीक्वलमध्ये कोण कलाकार पाहायला मिळणार, हे जाणून घेणे औत्सुकतेचे ठरणार आहे.