Maanayata Dutt : कधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करायची मान्यता दत्त, आता जगतंय असं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 11:13 IST2023-07-22T11:10:49+5:302023-07-22T11:13:21+5:30

मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे.

Maanayata dutt birthday special career c grade films love life sanjay dutt family changed her name three times unknown facts | Maanayata Dutt : कधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करायची मान्यता दत्त, आता जगतंय असं आयुष्य

Maanayata Dutt : कधी बी ग्रेड चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग करायची मान्यता दत्त, आता जगतंय असं आयुष्य

अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिचा आज (22 जुलै) वाढदिवस. 2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख. 22 जुलै 1978 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. पण  ती लहानाची मोठी झाली ती दुबईत. मान्यताला मोठी अभिनेत्री बनायचे होते. बॉलिवूडमध्ये आल्यावर तिने आपले नाव सारा खान ठेवले. फिल्म इंडस्ट्रीत तिला याच नावाने ओळखले जायचे. पण प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तिने आपले नाव पुन्हा बदलले आणि मान्यता हे नवे नाव धारण केले.

प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ या चित्रपटात ‘अल्हड जवानी’ हे आयटम सॉन्ग करून मान्यता प्रकाशझोतात आली. मान्यताच्या वडिलांचा दुबईत बिझनेस होता. पण त्यांच्या मृत्यूनंतर घराची संपूर्ण जबाबदारी मान्यतावर आली. याचमुळे तिच्या फिल्मी करिअरला ब्रेक लागला. ती फॅमिली बिझनेसमध्ये गुंतली.

मान्यताला एक मोठी अभिनेत्री बनायचे होते. पण अनेक प्रयत्न करूनही तिला कुठलाच मोठा चित्रपट आॅफर झाला नाही. यामुळे मान्यताने बी आणि सी ग्रेड चित्रपटांत काम करणे सुरु केले.  प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर केल्यानंतर तरी आपल्याला काम मिळेल, अशी तिची अपेक्षा होती. पण असे काहीही झाले नाही.

मान्यता आणि संजय दत्तची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करू लागले. संजयच्या प्रेमात पडल्यावर मान्यताने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तचे हे तिसरे आणि मान्यताचे दुसरे लग्न आहे. सध्या मान्यता दोन मुलांसोबत दुबईत आलिशान आयुष्य जगते आहे. 

Web Title: Maanayata dutt birthday special career c grade films love life sanjay dutt family changed her name three times unknown facts