Luxurious कारची मालकीण बनली ‘ही’ गायिका; कारची किंमत वाचून तुम्ही दंग व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 19:00 IST2018-02-21T13:30:34+5:302018-02-21T19:00:34+5:30

गायिका नेहा कक्कड हिने नुकतेच Mercedes-Benz GLS 350 या कंपनीची कार खरेदी केली आहे. कारची डिलिव्हरी घेतानाचे काही फोटोज् तिने ...

Luxurious car owner became 'only' singer; You will be stuck after reading the price of the car! | Luxurious कारची मालकीण बनली ‘ही’ गायिका; कारची किंमत वाचून तुम्ही दंग व्हाल!

Luxurious कारची मालकीण बनली ‘ही’ गायिका; कारची किंमत वाचून तुम्ही दंग व्हाल!

यिका नेहा कक्कड हिने नुकतेच Mercedes-Benz GLS 350 या कंपनीची कार खरेदी केली आहे. कारची डिलिव्हरी घेतानाचे काही फोटोज् तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून, चाहत्यांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. एका फोटोत नेहा कारची चावी घेताना दिसत असून, तिच्या चेहºयावर कमालक्षचा आनंद दिसत आहे. नेहाने खरेदी केलेल्या तिच्या या नव्या कारची किंमत ९५.७२ लाख इतकी आहे. 





नेहा सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळेच अधिक चर्चेत आहे. सध्या ती अभिनेता हिमांशू कोहली याला डेट करीत आहे. हिमांशू नेहापेक्षा एक वर्षाने लहान असल्याने त्यांच्यातील नाते सध्या चांगलेच चर्चिले जात आहे. व्हॅलेंटाइन वीकमध्ये इन्स्टाग्रामवर दोघांची बॉण्डिंग बघावयास मिळाली होती. ज्या पद्धतीने दोघांचे फोटो समोर आले त्यावरून त्यांच्यातील नाते दीर्घकाळ टिकणार असेच काहीसे दिसत आहे. 









दिल्लीत राहणाºया हिमांशने ‘यारियां’ (२०१४) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात नेहाने ‘सनी-सनी’ हे गाणे गायिले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली अन् त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हिमांशू याने अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली आहे. 

Web Title: Luxurious car owner became 'only' singer; You will be stuck after reading the price of the car!