लकी अलीच्या ‘या’ व्हिडीओनं चाहत्यांला लावलं याडं, एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:08 PM2021-01-12T17:08:13+5:302021-01-12T17:09:39+5:30

व्हिडीओ सोशल मीडियावर हीट

lucky ali o sanam 2021 viral share by aamir ali watch video | लकी अलीच्या ‘या’ व्हिडीओनं चाहत्यांला लावलं याडं, एकदा पाहाच

लकी अलीच्या ‘या’ व्हिडीओनं चाहत्यांला लावलं याडं, एकदा पाहाच

googlenewsNext
ठळक मुद्देहृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती.

समझे जमाना के, दिल है खिलौना, जाना है अब क्या है, दिल का लगाना, नजरों से अब ना, हमको गिराना, मर भी गए तो... या सुंदर गाण्यांचे सूर छेडले गेलेत आणि समोरचे सगळे मंत्रमुग्ध झाले. गायक होता लकी अली.लकी अलीच्या ‘ओ सनम’ या गाण्याचे ‘लेस्ट लकी अली’ व्हर्जन पुन्हा व्हायरल झाले असून आत्तापर्यंत 1 लाख 77 हजारांवर लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
आमिर अलीने 9 जानेवारीला हा व्हिडीओ शेअर केला. ‘माझे आॅल टाईम फेवरेट लकी अली. अलीकडे लकी अलीची भेट झाली. नि:शब्द झालो. फक्त पाहा आणि या सुंदर गाण्याचा आस्वाद घ्या,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना आमिर अलीने लिहिले आहे.

यापूर्वी डिसेंबरमध्येही लकी अलीचा गोव्यातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान हिट झाला होता. त्यांच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 4 लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले होते. अभिनेत्री नफीसा अली यांनी  हा व्हिडिओ शेअर केला  होता.

हृतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील गाण्यांनी लकी अलीला एक नवी ओळख दिली होती. ‘ए पल का जीना’ आणि ‘क्यो होता है प्यार’ ही दोन गाणी लकीने गायली होती. पण यानंतर लकी गायकीच्या क्षेत्रातही फार चमकला नाही.   यशाच्या बाबतीत लकी भलेही अपयशी ठरला असेल पण लग्नाच्या बाबतीत म्हणाल तर त्याची तीन लग्ने झालीत. मेघन जेन मकक्लियरी हिच्यासोबत लकीने पहिले लग्न केले. तिने लकीच्या ‘सुनो’ या अल्बममध्ये काम केले होते. मेघन व लकीला दोन मुले झालीत. पण नंतर या दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर लकीने इनायासोबत लग्न केले. इनायापासूनही लकीला दोन मुले झालीत. पण तिच्यापासूनही लकी विभक्त झाला. यानंतर लकीच्या आयुष्यात आयशा आली. सन २०१० मध्ये लकी व आयशा लग्नबंधनात अडकले होते. त्यांचा सहा वर्षांचा मुलगाही आहे. मिस ग्रेट ब्रिटन राहून चुकलेली आयशा मुंबईत मॉडेलिंग करते. शिवाय ती गिटार प्लेअरही आहे. आयशाने बेंगळुरूचा एक गिटार बँड ज्वॉईन केला आहे.

Web Title: lucky ali o sanam 2021 viral share by aamir ali watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.