​आलियाच्या आवाजात ‘लव्ह यू जिंदगी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 17:22 IST2016-11-29T17:22:59+5:302016-11-29T17:22:59+5:30

Love you zindgi club mix alia : डिअर जिंदगी या चित्रपटातील लव्ह यू जिंदगी हे गाण्याचे क्लब मिक्स व्हर्जन आलियाने गायले आहे.

'Love You Zindagi' in Alia's voice | ​आलियाच्या आवाजात ‘लव्ह यू जिंदगी’

​आलियाच्या आवाजात ‘लव्ह यू जिंदगी’

ong>बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि बबली गर्ल आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आलियाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. तिच्या आवाजात ‘डिअर जिंदगी’चे ‘लव्ह यू जिंदगी’ हे क्लब मिक्स गाणे रिलीज करण्यात आले आहे. 

गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ने रिलीजनंतर चारच दिवसांच सुमारे 40 कोटींचा बिझनेस केला. यातील आलियाच्या अभिनयाची जोरदार प्रसंशा होतेय.  शाहरुख तर या चित्रपटाची ‘जान’आहे,असेच म्हणावे लागेल. या चित्रपटाच्या अनेक गोष्टी उजव्या गोष्टींपैकी एक म्हणजे याचे संगीत. अमित त्रिवेदी यांनी चित्रपटासाठी तयार केलेल्या गाण्यांनी तरुणाईवर भूरळ घातलीयं. अरिजित सिंगच्या आवाजातील  ‘ऐ जिंदगी गले लगा ले’ या गाण्याने तर तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. 

आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर ‘डिअर जिंदगी’तील आलिया भट्टने गायलेले ‘लव्ह यू जिंदगी’ हे क्लब मिक्स गाणे रिलीज करण्यात आले आहे. हे मूळ गाणे जसलीन रॉयल व आमित त्रिवेदी यांनी गायले आहे. तर याच्या क्लब मिक्स्ला आलियाने आवाज दिला आहे. 3.35 मिनिटांचे हे गाणे निश्चितपणे मनाचा ठाव घेणारे आहे. चित्रपट समीक्षकांच्या मते, ‘डिअर जिंदगी’च्या दिग्दर्शकांना अपेक्षित होते ते गीतकार व संगीतकारांच्या जोडीने जुळवून आणले आहे.  ‘डिअर जिंदगी’ची गाणी बराच वेळ प्रेक्षकांच्या लक्षात राहतील असेही समीक्षकांचे मत आहे.  यापूर्वी आलियाने ‘हम्टी शर्मा की दुल्हनीया’ व ‘हायवे’ या चित्रपटाची गाणी गायली आहेत. 


Web Title: 'Love You Zindagi' in Alia's voice