​‘बँक चोर’चा धमाकेदार ट्रेलर पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 13:59 IST2017-05-09T08:29:30+5:302017-05-09T13:59:30+5:30

होय, ‘धूम’सीरिजनंतर पुन्हा एकदा काही कूल अ‍ॅण्ड स्मार्ट चोर बँक लुटायला येत आहेत. होय, रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय स्टारर ‘बँक चोर’ या चित्रपटाचे ट्रेलर आज लॉन्च झाले.

Look at the stolen trailer of 'Bank Thief'! | ​‘बँक चोर’चा धमाकेदार ट्रेलर पाहाच!

​‘बँक चोर’चा धमाकेदार ट्रेलर पाहाच!

य, ‘धूम’सीरिजनंतर पुन्हा एकदा काही कूल अ‍ॅण्ड स्मार्ट चोर बँक लुटायला येत आहेत. होय, रितेश देशमुख आणि विवेक ओबेरॉय स्टारर ‘बँक चोर’ या चित्रपटाचे ट्रेलर आज लॉन्च झाले. यासोबतच चित्रपटाचे एक नवे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रितेश देशमुख २००० च्या नोटेला लक्ष्य करताना दिसतोय.त्याच्या मागे दिसतोय तो विवेक ओबेरॉय. जो पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे.



या पोस्टरसोबत लॉन्च करण्यात आलेले ट्रेलरही तसेच खास आहे. हे कदाचित पहिले ट्रेलर आहे, जे अन्य चित्रपटाच्या सीन्सने सुरु होते. होय, ‘धूम2’ आणि ‘धूम3’मधील काही सीन्सने ट्रेलरची सुरुवात होते. यानंतर दिसतो तो, एका साधूच्या वेशात बँक लुटण्यासाठी पोहोचलेला चोर. हा साधू म्हणजेच रितेश देशमुख. यानंतर या ट्रेलरमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक विनोदी प्रसंग येतात, हीच चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाची कथा तीन चोरांभोवती फिरताना दिसणार आहे. बम्पी दिग्दर्शित या चित्रपटात रितेश देशमुख परमेश्वरावर अतूट श्रद्धा असणाºया एका मराठी माणसाची भूमिका साकारतो आहे. बँकेचे लोन फेडण्यास असमर्थ ठरलेला चित्रपटाचा हा हिरो अखेर आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तीच बँक लुटण्याचा प्लान आखतो. यानंतरची गंमत जंमत या चित्रपटात दिसणार आहे. जवळपास तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये वापसी करणारा विवेक ओबेरॉय या चित्रपटात एका सीबीआय आॅफिसरच्या भूमिकेत आहे. रिया चक्रवर्ती हिचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या जून महिन्यात हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे ट्रेलर एन्जॉय करायलाच हवे. हे ट्रेलर कसे वाटले, ते जरूर कळवा.

Web Title: Look at the stolen trailer of 'Bank Thief'!