पाहा, ‘बाहुबली2’च्या ‘देवसेना’चा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अवतार!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2017 10:31 IST2017-04-30T05:01:22+5:302017-04-30T10:31:22+5:30

‘बाहुबली2’ रिलीज झाला आणि अपेक्षेनुसार, चित्रपट सुपरडुपर हिट झाला. बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम तोडत या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. चित्रपटाच्या ...

Look, the hot and bold avatar of DevSena from Bahubali2 !! | पाहा, ‘बाहुबली2’च्या ‘देवसेना’चा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अवतार!!

पाहा, ‘बाहुबली2’च्या ‘देवसेना’चा हॉट अ‍ॅण्ड बोल्ड अवतार!!

ाहुबली2’ रिलीज झाला आणि अपेक्षेनुसार, चित्रपट सुपरडुपर हिट झाला. बॉक्सआॅफिसवरचे सगळे विक्रम तोडत या चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच पे्रक्षकांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली होती. रिलीजनंतर या चित्रपटाचे यश तुम्ही पाहत आहाच. ‘बाहुबली2’च्या या अभूतपूर्व यशामागे अनेकांचे योगदान आहे. यातील स्टारकास्टचे योगदान यात फार मोठे आहे. एकीकडे चाहते ‘बाहुबली’ अर्थात अभिनेता प्रभासची प्रशंसा करताना  थकत नाहीयेत. दुसरीकडे ‘देवसेना’ची भूमिका साकारणा-या अनुष्का शेट्टीचीही समीक्षकांसह चाहत्यांनी मनापासून प्रशंसा केली आहे. देवसेनाची भूमिका माझ्या हृदयाच्या अतिशय जवळची आहे, असे अनुष्का एका मुलाखतीत म्हणाली होती. आता यावरून ‘बाहुबली2’ने अनुष्काला ओळख मिळवून दिली, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. कारण ‘बाहुबली2’पूर्वीही अनुष्काच्या चाहत्यांची संख्या कमी नव्हती. ‘बाहुबली2’नंतर तिच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. 





चित्रपटात एक पारंपरिक भूमिका साकारणारी अनुष्का रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. देवसेनाच्या साध्या लूक इतकाच तिचा हॉट अवतारही तिच्या चाहत्यांना प्रचंड भावतो.





‘बाहुबली’मध्येही देवसेनाची व्यक्तिरेखा होती. ही भूमिकाही अनुष्कानेच साकारली होती. पण चित्रपटाच्या पहिल्या भागात या व्यक्तिरेखेवर फार फोकस करण्यात आला नव्हता. पण ‘बाहुबली2’मध्ये देवसेनाची व्यक्तिरेखा एकदम प्रकाशझोतात आली.





‘बाहुबली’ व ‘बाहुबली2’पूर्वी अनुष्काने अनेक चित्रपटात अतिशय बोल्ड भूमिका साकारलेल्या आहेत. अनेक चित्रपटात तिने इंटीमेट सीन्सही दिले आहेत. बोल्डनेस आणि तितकीच दमदार अ‍ॅक्टिंग या बळावर अनुष्का साऊथची सुपरस्टार बनली आहे. मेल डॉमिनेटींग इंडस्ट्रीमध्ये अनुष्काने स्वत:चे एक वेगळे स्थान, वेगळी ओळख निर्माण केली आहे.





ALSO READ : कटप्पाने बाहुबली को क्यो मारा या प्रश्नाचे उत्तर झाले लीक

सन २००५ मध्ये पुरी जगन्नाथ यांच्या ‘सुपर’ या तेलगू चित्रपटाद्वारे अनुष्काने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटात नागार्जुन आणि आयशा टाकिया हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

Web Title: Look, the hot and bold avatar of DevSena from Bahubali2 !!