‘बार बार देखो’ नंतर अपयशाची भीती गेली -सिद्धार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2016 15:44 IST2016-11-13T15:44:01+5:302016-11-13T15:44:01+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा म्हणजे बॉलिवूडचा डॅशिंग, गुड लुकिंग, हॅण्डसम अभिनेता. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ पासून ते ‘बार बार देखो’ पर्यंतचे ...

Look again and again, the fear of failure went away- Siddhartha | ‘बार बार देखो’ नंतर अपयशाची भीती गेली -सिद्धार्थ

‘बार बार देखो’ नंतर अपयशाची भीती गेली -सिद्धार्थ

द्धार्थ मल्होत्रा म्हणजे बॉलिवूडचा डॅशिंग, गुड लुकिंग, हॅण्डसम अभिनेता. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ पासून ते ‘बार बार देखो’ पर्यंतचे त्याचे अनेक चित्रपट आलेत. यापैकी काही गाजले तर काही आपटले.  पण, यापैकी ‘बार बार देखो’ या चित्रपटाने त्याला बरंच काही शिकवले. मुख्य म्हणजे  ‘बार बार..’ मुळं तो अपयशाला सामोरे जायला शिकला. 

तो म्हणाला,‘चित्रपट हिट होईल वा नाही, आता मला याचे जराही टेन्शन येत नाही. कारण आता मी याची जराही फिकीर करत नाही. ‘बार बार देखो’ प्रदर्शित झाल्यानंतर मला अपयश काय असतं ते कळलं. बॉक्स आॅफिसवर चित्रपटांचा होणारा बिझनेस, त्याचे महत्त्व मला समजलं. या चित्रपटानंतर अपयशाबद्दलची माझ्या मनातील भीती कायमची दूर झाली. आता तर अपयशाचे टेन्शन घेण्यापेक्षा मला नवनव्या चित्रपटांमध्ये वेगळ्या धाटणीच्या भूमिका कराव्याशा वाटताहेत.’

सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच ‘न्यूझीलँड टुरिझम’ चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनला आहे. त्यानिमित्ताने त्याला संपूर्ण न्यूझीलँडमधील सौंदर्यांचा आस्वाद घ्यायला मिळतोय आहे. त्याचा आगामी चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असून यात तो सोनाक्षी सिन्हासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Look again and again, the fear of failure went away- Siddhartha