‘दंगल गर्ल’ ठरली ‘गेम चेंजर’! सान्या मल्होत्राने कोरलं ‘लोकमत मोस्ट स्टायलिस्ट’ पुरस्कारावर नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:16 IST2023-09-12T23:15:16+5:302023-09-12T23:16:03+5:30

Lokmat Most Stylish Award 2023 : अभिनेत्री सान्या मल्होत्राला यंदाच्या लोकमत मोस्ट स्टायलिश गेम चेंजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

lokmat msa 2023 jawan fame sanya malhotra awarded with most stylish game changer | ‘दंगल गर्ल’ ठरली ‘गेम चेंजर’! सान्या मल्होत्राने कोरलं ‘लोकमत मोस्ट स्टायलिस्ट’ पुरस्कारावर नाव

‘दंगल गर्ल’ ठरली ‘गेम चेंजर’! सान्या मल्होत्राने कोरलं ‘लोकमत मोस्ट स्टायलिस्ट’ पुरस्कारावर नाव

मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याच्या माध्यमातून केला जातो. यंदाही लोकमत मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्ड सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राला यंदाच्या लोकमत मोस्ट स्टायलिश गेम चेंजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी सान्याने खास लूक केला होता. तिने या पुरस्कार सोहळ्याला चार चांद लावले. 

सान्या मल्होत्राने बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं आहे. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात ती झळकली होती. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात सानियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘बधाई हो’, ‘शंकुतला देवी’ या चित्रपटांतही सान्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘लुडो’ या वेब सीरिजमध्ये सान्या मल्होत्राने अभिषेक बच्चनबरोबर  मुख्य भूमिका साकारली होती.

Web Title: lokmat msa 2023 jawan fame sanya malhotra awarded with most stylish game changer