LMOTY 2022: राजकारणात जायची वेळ आल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 08:28 PM2022-10-11T20:28:41+5:302022-10-11T20:29:48+5:30

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: Kiara Advaniला राजकारणात जायची वेळ आल्यास कुठला पक्ष जॉईन करणार? असं विचारलं असता तिने दिलेल्या उत्तराची आता चर्चा सुरू आहे. 

LMOTY 2022, Lokmat Awards: If the time comes to enter politics, would she join Eknath Shinde's party or Devendra Fadnavis', says Kiara Advani... | LMOTY 2022: राजकारणात जायची वेळ आल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली...

LMOTY 2022: राजकारणात जायची वेळ आल्यास शिंदेच्या पक्षात जाणार की फडणवीसांच्या, कियारा अडवाणी म्हणाली...

googlenewsNext

मुंबई - लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईत रंगला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध श्रेणीतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीतील महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी कियाराला राजकारणात जायची वेळ आल्यास कुठला पक्ष जॉईन करणार? असं विचारलं असता तिने दिलेल्या उत्तराची आता चर्चा सुरू आहे. 

पुरस्कार स्वीकारल्यावर कियारा अडवाणीला कुठलाही राजकीय पक्ष जॉईन करण्यास सांगितले तर एकनाथ शिंदेंच्या पक्षात जाणार की देवेंद्र फडणवीसांच्या, असा प्रश्न लोकमत प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष आणि एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना कियारा अडवाणी काही क्षण थांबली. त्यानंतर म्हणाली, मला माफ करा, मी अभिनेत्री म्हणूनच बरी आहे. 

यावेळी कियाराने मराठीत बोलत सर्वांचे आभार मानले. ती म्हणाली, मी मुंबईची मुलगी असल्याने मराठी माणसांमध्ये वाढली‌ आहे. माझे मित्र मैत्रिणी मराठी आहेत. मला शाळेत मराठी भाषा बंधनकारक होती. 

Web Title: LMOTY 2022, Lokmat Awards: If the time comes to enter politics, would she join Eknath Shinde's party or Devendra Fadnavis', says Kiara Advani...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.