लिजा रे हिच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीलाही कॅन्सर, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 12:58 IST2019-06-28T12:55:32+5:302019-06-28T12:58:26+5:30

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करणारी अभिनेत्री लिजा रे हिच्यासोबत काम करणा-या एका अभिनेत्रीलाही कॅन्सरने गाठले आहे.

lisa ray co-star sheetal seth posts on social media about her breast cancer | लिजा रे हिच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीलाही कॅन्सर, शेअर केली पोस्ट

लिजा रे हिच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीलाही कॅन्सर, शेअर केली पोस्ट

ठळक मुद्दे२००९ मध्ये लिजा रे हिलाही कॅन्सरने गाठले होते. हा काळ लिजासाठी खूप कठिण होता.

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात करणारी अभिनेत्री लिजा रे हिच्यासोबत काम करणा-या एका अभिनेत्रीलाही कॅन्सरने गाठले आहे. शीतल सेठ असे या अभिनेत्रीचे नाव. भारतीय वंशाची अमेरिकन अभिनेत्री शीतल सेठने ‘दी वर्ल्ड अनसीन’ या शोमध्ये लिजासोबत काम केले होते. सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल लिहिले आहे.
या पोस्टमध्ये शीतल स्वत:च स्व:ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतेय. या पोस्टमध्ये तिने ब्रेस्ट कॅन्सरबद्दल लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी मला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हे ऐकून मी हादरून गेले होते. कॅन्सर असल्याची बातमी विचित्र वेदना देणारी होती. अर्थात मी हिंमत सोडलेली नाही. या आजाराशी मी झुंज देतेय, असे शीतलने या पोस्टमध्ये लिहिले आहे. लोकप्रिय अमेरिकन शो Family Guy आणि NCIS: Los Angelesमध्ये शीतल दिसली आहे.




लिजाने शीतलची ही पोस्ट  रिट्वीट केली असून शीतला ‘वॉरिअर’ असे संबोधले आहे. २००९ मध्ये लिजा रे हिलाही कॅन्सरने गाठले होते. हा काळ लिजासाठी खूप कठिण होता. मल्टिपल माइलोमा नामक आजाराने ती ग्रस्त होती. हा पांढ-या रक्तपेशींशी निगडीत कॅन्सर आहे. २०१० मध्ये स्टेट सेल ट्रान्सप्लांट केल्यानंतर ती कॅन्सरमुक्त झाली होती. लिजाने जेसन डेहनीसह लग्न केले आहे.  लिजाला कॅन्सर झाला त्याकाळात जेसननेच लिजाला खपू धीर दिला आणि त्यामुळे आज लिजा या आजारावर मात करू शकली.  लिजा आणि जेसन दोघांनी वयाची चाळीशी ओलांडली आहे. दोघांनाही जुळ्या मुली आहेत.  सरोगसीच्या माध्यमातून लिजाने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला आणि सध्या ती मुलींचे बालपण एन्जॉय करत आहे.  

Web Title: lisa ray co-star sheetal seth posts on social media about her breast cancer