तर तुझ्या मुलांना..., ट्रोलर्सनी लिसा हेडनच्या मुलांनाही सोडलं नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 11:58 IST2021-08-01T11:56:26+5:302021-08-01T11:58:03+5:30

सोशल मीडियावर सक्रिय असलेले सेलिब्रिटी या ना त्या कारणानं ट्रोल होत असतात. अभिननेत्री लिसा हेडनही सध्या ट्रोल होतेय. पण यावेळी ट्रोलर्सनी लिसाच्या चिमुकल्या मुलांनाही सोडलं नाही.

lisa haydon slams troll with hard hitting reply who said her baby will be cursed | तर तुझ्या मुलांना..., ट्रोलर्सनी लिसा हेडनच्या मुलांनाही सोडलं नाही!!

तर तुझ्या मुलांना..., ट्रोलर्सनी लिसा हेडनच्या मुलांनाही सोडलं नाही!!

ठळक मुद्दे काही दिवसापूंर्वीच लिसा  तिसऱ्यांदा आई झाली आहे.  तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. याआधी तिला दोन मुलं आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असलेले सेलिब्रिटी या ना त्या कारणानं ट्रोल होत असतात. अभिननेत्री लिसा हेडनही (Lisa Haydon) सध्या ट्रोल होतेय. पण यावेळी ट्रोलर्सनी लिसाच्या चिमुकल्या मुलांनाही सोडलं नाही. लिसाला ट्रोल करताना ट्रोलर्सनी तिच्या मुलांबद्दलही अपशब्दांचा वापर केला. मुलांला लक्ष्य करण्यात आल्यावर लिसा शांत कशी बसणार? तिनं संबंधित ट्रोलर्सला लगेच प्रत्युत्तर दिलं.

 लिसानं अलीकडे एका फेस क्रिमला प्रमोट करत, त्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. तिची ही पोस्ट पाहून काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.  ‘लिसा हेडन केमिकल विकून लोकांचं आयुष्य बर्बाद करू नकोस. लोकांना मूर्ख  बनवशील तर तुझ्या मुलांना शाप लागेल,’ अशी कमेंट एका ट्रोलरने तिच्या या पोस्टवर केली.
लिसाचं लक्ष या कमेंटवर गेलं. मुलांना शाप देणा-या कमेंटवर तिनं लगेच उत्तर दिलं. ‘वाह...,’ अशा उपरोधिक शब्दात तिनं ट्रोलर्सची बोलती बंद केली.  यानंतर लिसाचे अनेक फॅन्स देखील तिच्या समर्थनात उतरले.  

 काही दिवसापूंर्वीच लिसा  तिसऱ्यांदा आई झाली आहे.  तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. याआधी तिला दोन मुलं आहेत. आॅक्टोबर 2016 साली तिने दिनो ललवानीशी विवाह केला होता. एक वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी विवाह केला होता. 2017 साली लिसाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर 2020 साली तिच्या दुसºया मुलाचा जन्म झाला. आपल्या मुलांसोबत ती नेहमीच सोशल मीड़ियावर फोटो शेअर करत असते. प्रेग्नंसीदरम्यानही तिने बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे अनेक फोटो शेअर केले होते. यावरूनही लिसा ट्रोल झाली होती.

Web Title: lisa haydon slams troll with hard hitting reply who said her baby will be cursed