प्रेग्नेंसीनंतर आता बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्ड फोटोमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 16:16 IST2019-09-07T16:16:08+5:302019-09-07T16:16:49+5:30

बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आहे आई

Lisa Haydon shows off baby bump in this stunning pregnant photoshoot | प्रेग्नेंसीनंतर आता बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्ड फोटोमुळे आली चर्चेत

प्रेग्नेंसीनंतर आता बॉलिवूडची ही अभिनेत्री बोल्ड फोटोमुळे आली चर्चेत

अभिनेत्री लिसा हेडन लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ती चर्चेत आली होती. मात्र नुकताच तिने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

प्रेग्नेंसीबद्दल सांगितल्यानंतर काही दिवसानंतर लिसानं फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिनं अमित अग्रवालसाठी रॅम्पवॉक केला.

प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच लिसानं फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता. नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिनं अमित अग्रवालसाठी रॅम्पवॉक केला. या शोसाठी ती शो स्टॉपर होती.

यानंतर तिनं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये लिसा ब्लॅक कलरच्या विदाउट स्लीव्ह ड्रेसमध्ये दिसत आहे. 
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं ती १९ आठवड्यांची गरोदर असल्याचं म्हटलं आहे. लिसा दुसऱ्यांदा आई होणार असून तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 

लिसानं २०१६ मध्ये डिनो लालवानीशी लग्न केलं होतं. त्यानंतर २०१७ मध्ये तिनं पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव जॅक आहे.

लिसा नेहमीच आपल्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: Lisa Haydon shows off baby bump in this stunning pregnant photoshoot