Liger: 'लाइगर'मधील विजय देवरकोंडाचा लूक पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:30 IST2022-07-02T12:30:11+5:302022-07-02T12:30:59+5:30

'लाइगर' (Ligar) चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda)चा जबरदस्त लूक समोर आला आहे.

Liger: Fans were shocked to see Vijay Devarkonda's look in 'Liger' | Liger: 'लाइगर'मधील विजय देवरकोंडाचा लूक पाहून चाहते झाले हैराण

Liger: 'लाइगर'मधील विजय देवरकोंडाचा लूक पाहून चाहते झाले हैराण

'लाइगर' (Ligar) चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda)चा जबरदस्त लूक समोर आला आहे. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून त्याच्या लूकची झलक दर्शवली आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त अनन्या पांडे (Ananya Panday) देखील मुख्य भूमिकेत आहे. एकीकडे विजय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर दुसरीकडे अनन्या पांडेही 'लाइगर'मधून साउथच्या इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.

लाइगरचे दिग्दर्शन पुरी जगन्नाध यांनी केले आहे आणि निर्मिती करण जोहरने केली आहे. या चित्रपटात माइक टायसनचा गेस्ट अपियरन्स असणार आहे. विजय आणि अनन्या व्यतिरिक्त या चित्रपटात राम्या कृष्णा, रोनित रॉय, अली, मकरंद देशपांडे आणि विष्णू रेड्डी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. २५ ऑगस्ट २०२२ रोजी लाइगर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


विजय देवरकोंडा तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटातून विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ आणि डिअर कॉम्रेड यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. आता त्याचे चाहते लाइगर चित्रपटात त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

Web Title: Liger: Fans were shocked to see Vijay Devarkonda's look in 'Liger'