आलियाला हवा असा ‘लाईफ पार्टनर’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 13:48 IST2016-11-15T13:39:03+5:302016-11-15T13:48:10+5:30
चुलबुली, फनी, हॉट आणि बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिचा लाईफ पार्टनर व्हायला कुण्या तरूणाला आवडणार नाही. पण, तिचा ...
.jpg)
आलियाला हवा असा ‘लाईफ पार्टनर’!!
च लबुली, फनी, हॉट आणि बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्ट हिचा लाईफ पार्टनर व्हायला कुण्या तरूणाला आवडणार नाही. पण, तिचा पार्टनर होणं इतकं सोप्पं नाही. आपल्या लाईफ पार्टनरबद्दल आलियाच्या काही आगळ्यावेगळ्या अपेक्षा आहेत. होय, आलियाला लाईफ पार्टनर म्हणून कुणी ‘हॉट अॅण्ड हॅण्डसम’ व्यक्ती नकोय तर स्वभावाने एकदम ‘फनी अॅण्ड स्वीट’ असा सोबती हवा आहे.
‘उपवर’आलिया कुठल्याही इव्हेंट जावो, ‘तू लग्न कधी करणार? लाईफ पार्टनरबद्दल तुझ्या अपेक्षा काय ? ’असे प्रश्न तिला हमखास विचारले जातात. या सततच्या प्रश्नांना आलिया कदाचित वैतागलीय. कारण आजपर्यंत ‘गोलमाल’ उत्तर देऊन आलिया हे प्रश्न टाळत होती. पण अलीकडे एका इव्हेंटला आलियाने याचे खरे खरे उत्तर देत सुटकेचा नि:श्वास सोडला. मला खूप देखणा वगैर नवरा नकोय. तो केवळ विनोदी स्वभावाचा असावा. त्याने मला खूप हसवावे आणि मी हसावे, इतकेच, असे आलिया म्हणाली. नुकत्याच लाँच झालेल्या ‘फिल्मफेअर’च्या कव्हर पेजवर आलिया भट्टचा ग्लॅमरस लुक पहावयास मिळत आहे. तिचा हॉट अॅण्ड डॅझलिंग लुक सर्वांचे लक्ष आकर्षून घेत आहे.
‘हायवे’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’,‘स्टुडंट आॅफ दी ईयर’,‘ शानदार’,‘२ स्टेट्स’ या चित्रपटांमध्ये आलियाने स्वत:इतकाच देखणा अभिनय केला. लवकरच ती ‘डिअर जिंदगी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यात ती शाहरूख खान आणि कुणाल कपूर यांच्यासोबत मुख्य भूमिकेतआहे. गौरी शिंदे दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक वेगळ्या धाटणीचे असून चित्रपटरसिकांना हे आगळेवेगळे कथानक कितपत आवडते ते आता लवकरच कळेल!!!