​जाणून घ्या कसे दिसते सलमान खानचे गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील वन बीएचके घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 13:06 IST2017-12-27T07:36:11+5:302017-12-27T13:06:11+5:30

सलमान खानचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट होतातच. तसेच बिग बॉस, दस का दम असे अनेक हिट ...

Learn how it looks at one BHK home in Salman Khan's GalaxyApartment | ​जाणून घ्या कसे दिसते सलमान खानचे गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील वन बीएचके घर

​जाणून घ्या कसे दिसते सलमान खानचे गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील वन बीएचके घर

मान खानचे चित्रपट म्हटले की, ते बॉक्स ऑफिसवर हिट होतातच. तसेच बिग बॉस, दस का दम असे अनेक हिट कार्यक्रम त्याने छोट्या पडद्याला दिले आहेत. सलमान जाहिरात क्षेत्रातही हिट आहे. तो आज अनेक मोठ्या ब्रँडचा ब्रँड अम्बेसेडर आहे. सलमानची ही सगळी मिळकत पाहाता सलमान हा करोडपती आहे. सलमान करोडपती असल्यामुळे सलमानचे घर देखील तितकेच मोठे असणार हे सगळ्यांना वाटते. पण सलमानचे घर कसे आहे हे तुम्हाला कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. 
सलमान गेल्या अनेक वर्षांपासून वांद्र्यातील गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये राहातो. तो त्याचे आई-वडील, भाऊ अरबाज खान, सोहेल खान, बहीण अल्विरा आणि अर्पिता यांच्यासोबत या घरात पूर्वी राहात असे. पण आता त्याच्या सगळ्या भावंडाची लग्न झाली असून ते आता सगळे वेगळे राहातात. केवळ सलमान त्याच्या आई वडिलांसोबत राहातो. या त्याच्या घराच्या बाहेर त्याचे अनेक चाहते त्याची एक झलक पाहायला मिळावी यासाठी कित्येक तास उभे असतात. पण त्याचे घर आतमधून कसे आहे, किती मोठे आहे हे त्याच्या चाहत्यांना माहीतच नाहीये. सलमानचे घर प्रचंड मोठे असेल असेच त्याच्या प्रत्येक चाहत्याला वाटत असते. पण त्याचा फ्लॅट हा केवळ वन बीएचकेचा आहे हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. सलमान केवळ वन बीएचकेच्या फ्लॅटमध्ये अनेक वर्षांपासून राहातो. 

salman khan galaxy apartment

गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये खान कुटुंबाचे दोन फ्लॅट आहेत. एका फ्लॅटमध्ये सलमानचे वडील सलीम खान आणि त्याची आई सलमा खान राहातात तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये सलमान खान राहातो. सलमानच्या खोलीत केवळ तीनच रूम आहेत. घरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. हा लिव्हिंग रूम एल आकारात असून त्याच्या समोरच ओपन किचन आहे. या लिव्हिंग रूममध्ये एक डायनिंग टेबल देखील आहे. सलमानच्या बेडरूममध्ये एक भला मोठा बेड आहे. बेडरूमची जास्तीत जास्त जागा ही या बेडनेच व्यापली आहे. सलमानच्या फ्लॅटमध्ये केवळ एकच बाथरूम आहे. 

Web Title: Learn how it looks at one BHK home in Salman Khan's GalaxyApartment