leaked Inside videos and pics ! असा सजला नवरदेव नागा चैतन्य ! समांथा रूथसोबत बांधणार लग्नगाठ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 11:54 IST2017-10-06T06:13:40+5:302017-10-06T11:54:58+5:30
यंदाचा म्हणजे २०१७ मधील सर्वांत भव्यदिव्य सेलिब्रिटी विवाह सोहळा आज ६ आॅक्टोबरला होऊ घातला आहे. अगदी काही तासांत दोघांचीही लग्नगाठ बांधली जाईल.

leaked Inside videos and pics ! असा सजला नवरदेव नागा चैतन्य ! समांथा रूथसोबत बांधणार लग्नगाठ!!
य दाचा म्हणजे २०१७ मधील सर्वांत भव्यदिव्य सेलिब्रिटी विवाह सोहळा आज ६ आॅक्टोबरला होऊ घातला आहे. साऊथचा लोकप्रीय अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समांथा रूथ हे दोघेही आज विवाहबंधनात अडकणार आहेत. अगदी काही तासांत दोघांचीही लग्नगाठ बांधली जाईल. कॅथॅलिक आणि पारंपरिक अशा दोन पद्धतीने हा विवाहसोहळा होणार आहे. आज ६ आॅक्टोबरला पारंपरिक पद्धतीने विवाह होईल आणि उद्या ७ आॅक्टोबरला नागा चैतन्य व समांथा कॅथॅलिक पद्धतीने विवाह करतील.
![]()
गोव्यातील डब्ल्यू रिसॉर्टमध्ये या विवाहासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. लग्नाची जय्यत तयारी झालीयं. वरही तयार आहे. होय, वर अर्थात नवरदेव चैतन्य सजला आहे. त्याचा पहिला फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पिस्ता कलरचा कुर्ता, माथ्यावर टीळा आणि गळ्यात पुष्पहार असा चैतन्य कमालीचा हॅण्डसम दिसतोय. या लग्नाचे आणखी काही फोटोही आम्ही घेऊन येणार आहोच. तोपर्यंत नागा चैतन्यचा हा फोटो कसा वाटला, ते सांगायला विसरू नका.
![]()
ALSO READ : नागार्जुनच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वाचून तुम्ही अवाक् व्हाल; दाम्पत्य ४० दिवस जाणार हनिमूनला!
या शाही लग्नासाठी केवळ १५० पाहुण्यांना बोलवण्यात आले आहे. चर्चा खरी मानाल तर या लग्नावर १० कोटी रुपए खर्च होणार आहे. या लग्नानंतर हैदराबादेत ग्रँड रिसेप्शन होणार आहे. लग्नानंतर समांथा व नागा चैतन्य दोघेही आपआपल्या चित्रपटाचे शूटींग पूर्ण करतील आणि त्यांनर ४० दिवसांच्या दीर्घ हनीमूनवर जातील. हे हनीमून दोन महिन्यांचे असू शकते, असेही म्हटले जात आहे.
‘ये माया चेस्वे’च्या सेटवर नागा चैतन्य व समांथा यांची पहिली भेट झाली होती आणि या पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. २००९ मध्ये आलेला ‘ये माया चेस्वे’ हा समांथाचा पहिला चित्रपट होता. समांथाने सप्टेंबर २०१६ मध्ये नागासोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपची जाहीरपणे वाच्यता केली होती. वास्तविक हे जोडपं गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहे. एका मुलाखतीत समांथाने सांगितले होते की, इंडस्ट्रीत नागा हा आधी माझा मित्र बनला. पुढे बेस्ट फ्रेंड आणि पुढे प्रियकर. दरम्यान या दोघांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता.