लारा दत्ताने या कारणामुळे घेतला होता अभिनयातून ब्रेक, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 16:48 IST2020-04-28T16:32:35+5:302020-04-28T16:48:56+5:30

बॉलिवूड लारा दत्ता दीर्घकाळानंतर वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा पदार्पण केले आहे.

lara dutta on why she took break from acting gda | लारा दत्ताने या कारणामुळे घेतला होता अभिनयातून ब्रेक, स्वत: केला खुलासा

लारा दत्ताने या कारणामुळे घेतला होता अभिनयातून ब्रेक, स्वत: केला खुलासा

बॉलिवूड लारा दत्ता दीर्घकाळानंतर वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा एकदा पदार्पण केले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार लाराने सांगितले की तिने करिअरमधून एवढे मोठा ब्रेक का घेतला. आपल्या मुलीला पूर्णवेळ देण्यासाठी मी कामातून ब्रेक घेतला.  


लाराने सांगितले की,'' सायरा जन्म झाला तेव्हा माझी पहिली जबाबदारी ती होती. मी आणि महेशने आधीच ठरवले होते की दोघांपैकी एकजण तिच्यासोबत राहिल. त्यावेळी मला असे वाटले की माझे मुलीसोबत राहणं जास्त गरजेच आहे.'' लारा पुढे म्हणाली, ''त्यानंतर मी काम कमी यासाठी देखील केले की मला चांगले काम सुद्धा नाही मिळाले. त्यानंतर मी स्किन केअर आणि प्रोडक्शनमध्ये व्यस्त झाले.''  


हंड्रेड नावाच्या वेबसिरीजमधून लारा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्लाच्या भूमिकेत झळकतेय. या भूमिकेत परफेक्शन आणण्यासाठी महिला पोलिसांकडून तिने खास टीप्स घेतल्या होत्या. सैराट गर्ल रिंकू राजगुरु आणि लारा दत्ता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते आहे. स्वित्झर्लंड एकदा तरी पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी रिंकूला अचानक ब्रेन ट्युमरचा आजार होतो. अगदी जगण्यासाठी कमी वेळ तिच्यासाठी असतो. अशात ती पोलिस इन्सपेक्टर बनलेली लारा दत्तासह काम करायला सुरूवात करते आणि त्यानंतर कशा रितीने तिच्या स्वप्नांना ती भरारी देते अशा आशयाची ही कथा आहे.

Web Title: lara dutta on why she took break from acting gda