'रामायण'मध्ये लारा दत्ता साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका?; म्हणाली, 'रामायणचा भाग असावं असं..'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:07 PM2024-05-01T12:07:04+5:302024-05-01T12:07:42+5:30

Lara Dutta: 'रामायण'मध्ये लारा दत्ता कैकयीची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.

lara-dutta-opens-on-playing-kaikeyi-role-in-ranbir-kapoor-starrer-ramayan-says-who-would-not | 'रामायण'मध्ये लारा दत्ता साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका?; म्हणाली, 'रामायणचा भाग असावं असं..'

'रामायण'मध्ये लारा दत्ता साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका?; म्हणाली, 'रामायणचा भाग असावं असं..'

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) लवकरच रामायण या आगामी सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा बहुप्रतिक्षीत ठरत असून या सिनेमातील भूमिकांवरील एक एक करत पडदा दूर सारला जात आहे. यामध्येच आता या सिनेमात अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) कैकयीची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच लाराने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सिनेमाविषयी खुलासा केला.

सध्या सोशल मीडियावर रामायण या सिनेमाविषयी अनेक चर्चा रंगत आहेत. यामधयेच या सिनेमात लारा दत्ता सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या चर्चांना लाराने पूर्णविराम दिला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'सोबत बोलत असताना लाराने या सिनेमाविषयी मोठा खुलासा केला आहे.

रामायणमध्ये लारा साकारणार कैकयीची भूमिका?

"या सिनेमात माझी भूमिका आहे असं माझ्याही कानावर आलं आहे. पण मी एक क्लिअर करते. मला माझ्याविषयी पसरणाऱ्या अफवा ऐकायला आवडतात. ज्या अफवा पसतायेत त्या पसरू देत रामायणचा भाग असावं असं कोणाला वाटणार नाही? या सिनेमात बरीच पात्र आहेत. त्यामुळे जर मला एका भूमिकेची जरी ऑफर मिळाली तरी मी आवडीने ती साकारेन. शूर्पणखा, मंदोदरी कोणतीही भूमिका करायला मी तयार आहे, असं लारा म्हणाली.

दरम्यान, लारा अलिकडेच 'रणनिती:बालकोट अँड बियॉन्ड' या सीरिजमध्ये झळकली आहे. या सीरिजमध्ये तिच्यासोबत जिमी शेरगील, प्रसन्ना, आशुतोष राणा, आशिष विद्यार्थी हे कलाकार झळकले आहेत. 

Web Title: lara-dutta-opens-on-playing-kaikeyi-role-in-ranbir-kapoor-starrer-ramayan-says-who-would-not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.