मिस यूनिव्हर्स ते स्टायलिश 'मॉम', 21 वर्षांमध्ये इतकी बदलली लारा दत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:13 IST2021-04-16T16:01:07+5:302021-04-16T16:13:25+5:30
Lara dutta birthday unknown facts about her look transform : बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.

मिस यूनिव्हर्स ते स्टायलिश 'मॉम', 21 वर्षांमध्ये इतकी बदलली लारा दत्ता
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये 16 एप्रिल 1978मध्ये लाराचा जन्म झाला होता. 2000 साली मिस यूनिव्हर्सचा किताब मिळवणा-या लाराचे वडील पंजाबी तर आई अॅंग्लो इंडियन आहे. आता भलेही ती जास्त सिनेमांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते. चला जाणून घेऊया लाराबद्दलच्या काही खास गोष्टी...
मिस यूनिव्हर्स झाल्यानंतर लाराला बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास सुरवात केली. 2003 साली रिलीज झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या चित्रपटात लारासोबत प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमारदेखील दिसले होते. चित्रपटातील लाराच्या सौंदर्याचे सर्वांनी कौतुक केले. या चित्रपटासाठी तिला पहिला फिल्मफेअरचा डेब्यू पुरस्कार मिळाला होता.
लारा तिच्या लव्ह लाईफला घेऊन देखील चर्चेत राहिली. केली दोरजी पासून ते दीनो मोरियापर्यंत आणि टायगर वुड्स ते महेश भूपतीपर्यंत लाराचं नाव जोडलं गेलं. लाराचं लव्ह लाईफ नेहमीच वादात राहिलं. लारा ही सुरुवातीला मॉडेल आणि अभिनेता केली दोरजीला डेट करत होती. नंतर मिस युनिव्हर्स झाल्यावर लाराने जाहीरपणे आपलं रिलेशनशीप स्वीकारले. यानंतर 2009मध्ये लारा आणि महेश भूपतीच्या अफेअरची चर्चा सुरु झाली.
लारा दत्ता आणि महेश भूपती या दोघांची भेट महेशच्या एन्टटेन्मेंट आणि स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीच्या एका बिझनेस मिटींग दरम्यान झाली होती. लारा दत्ताने तिच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचं काम महेशच्या कंपनीला दिलं होतं. या भेटीनंतर लारा आणि महेश डेटिंग करु लागले. यादरम्यान महेश भूपती माजी मिस यूनिव्हर्स लारा दत्ताच्या प्रेमात पडला. पण दोघांनी अनेकवर्ष आपलं नातं लपवून ठेवलं होतं. पुढे 16 फेब्रुवारी 2011 मध्ये भूपतीने मुंबईत लारासोबत लग्न केलं. आता त्यांना एक मुलगी असून त्यांनी तिचं नाव सायरा ठेवलं आहे.