भूमी पेडणेकरने केले मान्य; म्हटले, ‘माझे बऱ्याचशा तरुणांशी होते अफेअर’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 16:44 IST2017-10-01T11:12:45+5:302017-10-01T16:44:26+5:30
बॉक्स आॅफिसवर एकापाठोपाठ एक असे दोन सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या मते, तिचे लग्न तिच्या कामाबरोबर झाले आहे. ...

भूमी पेडणेकरने केले मान्य; म्हटले, ‘माझे बऱ्याचशा तरुणांशी होते अफेअर’!!
ब क्स आॅफिसवर एकापाठोपाठ एक असे दोन सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या मते, तिचे लग्न तिच्या कामाबरोबर झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भूमीचे ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ असे दोन चित्रपट रिलीज झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरले. दरम्यान, हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना भूमीने एक खळबळजनक खुलासा केला. तिने मान्य केले की, तिने अनेक पुरुषांना डेट केले आहे. भूमीने म्हटले की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तेव्हा मी लहान होती. खूपच भोळी आणि इन्मॅच्योर होती. त्यामुळे हे कधी आणि कसे घडत गेले हे मला कळालेच नाही. परंतु आता मी माझ्या सर्व एक्स बॉयफ्रेंडची चांगली मैत्रिण आहे. मला असे वाटते की, हा असा अनुभव आहे ज्यामुळे तुमची व्यक्ती म्हणून जडणघडण होते. यावेळी भूमीने हादेखील खुलासा केला की, सध्या मी कोणासोबतही रिलेशनशिपमध्ये नसून, सिंगल आहे.
भूमीने म्हटले की, कामाव्यतिरिक्त मला दुसरी कुठलीही एक्साइटमेंट नाही. मी बºयाचशा को-स्टारसोबत काम न केल्याने माझ्याविषयी कुठल्याही प्रकारची अफवा नाही. थोडक्यात, तुम्ही असे समजू शकता की, सध्या माझे कामाबरोबरच लग्न झाले आहे. भूमीने यावेळी हेदेखील स्पष्ट केले की, ती रिलेशनमध्ये राहण्याच्या विरोधात नाही. सध्या मी माझ्या कामाचा आनंद घेत आहे. पुढे बोलताना भूमीने म्हटले की, सध्या मी यशाची चव चाखत आहे. त्यामुळे आयुष्यातील कुठल्याही गोष्टीशी मला तडजोड करायची नाही. आतापर्यंत भूमीने आयुष्यमान खुराना आणि अक्षयकुमार यांच्यासोबत काम केले.
![]()
भूमीने जोडीदार कसा असावा याविषयीदेखील खुलासा केला. तिने म्हटले की, तुमच्या जोडीदारामध्ये बºयाचशा क्वालिटी असायला हव्यात. माझ्या परिवाराकडून माझ्यावर सध्या कुठल्याही प्रकारचा लग्नासाठी दबाव नाही. नशिबाने माझा अशा परिवारात जन्म झाला, ज्याठिकाणी तुम्ही तोपर्यंत लग्न करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाहीत. सध्या भूमी अभिषेक चौबे यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या चित्रपटात काम करीत आहे. अक्षयसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी भूमीने सांगितले की, शूटिंगदरम्यान अक्षय स्वत:ला कधीच सुपरस्टार समजत नाही. तो त्याचे काम अधिकाधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी मला सांगितले होते की, काळजी करू नकोस... आपण मित्र आहोत. कोणीही सीनियर-ज्युनियर नाही.