लालू प्रसाद यादव यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; बायोपिक येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 04:45 PM2023-10-27T16:45:51+5:302023-10-27T16:49:24+5:30

लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक तयार करण्यात येणार आहे. 

Lalu Prasad Yadav’s biopic in making | लालू प्रसाद यादव यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; बायोपिक येणार!

लालू प्रसाद यादव यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर; बायोपिक येणार!

 जेव्हा राजकारणाबद्दल बोलले जाते, तेव्हा एक नाव सर्वांच्याच जीभेवर असते, ते म्हणजे लालू प्रसाद यादव.  हटके लूक, त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांचा रूबाब यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. लालू प्रसाद यादव हे आपल्या गंमतीशीर स्वभावामुळे आणि भाषणांमुळेही प्रसिद्ध आहेत. लालू प्रसाद यादव यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक तयार करण्यात येणार आहे. 

लालू प्रसाद यादव यांच्या बायोपिकवर गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. या बायोपिकची निर्मिती प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे केली जाणार आहे.  चित्रपटात लालू यादव यांची भुमिका कोण साकारणार याबाबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. शिवाय, चित्रपटाचं नाव हे 'लालटेन' असणार आहे.  लालटेन हे लालू यादव यांच्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. तर चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

लालू प्रसाद त्या नेत्यांमध्ये आहे, ज्यांना संपूर्ण देश वाचतो आणि ऐकतो. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे यशस्वी केंद्रीय रेल्वे मंत्री राहिलेले लालू यादव देशातील मोठ्या राजकारण्यांमध्ये गणले जातात.  लालू प्रसाद आणि राबडी देवी यांना 7 मुली आणि 2 मुले आहेत. लालूंच्या सर्व मुलींमध्ये त्यांची मोठी मुलगी मीसा भारती ही राजकारणात सक्रीय आहे, तर मुलगा तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे राजकारणात आहेत.

Web Title: Lalu Prasad Yadav’s biopic in making

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.