Lalit Modi & Sushmita Sen : ललित मोदी व सुश्मिता सेन यांचं बिनसलं? ‘त्या’ एका बदलामुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 10:59 IST2022-09-04T10:57:40+5:302022-09-04T10:59:47+5:30

Lalit Modi & Sushmita Sen : सुश्मिता व ललित मोदींच्या डेटींगची बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. 

Lalit Modi & Sushmita Broke Up IPL Founder Removed Sushmita’s Name & DP From His Instagram | Lalit Modi & Sushmita Sen : ललित मोदी व सुश्मिता सेन यांचं बिनसलं? ‘त्या’ एका बदलामुळे चर्चांना उधाण

Lalit Modi & Sushmita Sen : ललित मोदी व सुश्मिता सेन यांचं बिनसलं? ‘त्या’ एका बदलामुळे चर्चांना उधाण

आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींनी (Lalit Modi ) काही दिवसांपूर्वीच ‘धमाका’ केला होता. होय, बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला (Sushmita Sen) ‘बेटर हाफ’ म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. अर्थात यानंतर 7 मिनिटांत दुसरं ट्विट करत, त्यांनी आमचं लग्न झालेलं नसून सुश्मिता व मी फक्त डेट करत असल्याचं म्हटलं होतं. एकमेकांसोबतचे काही रोमॅन्टिक फोटोही त्यांनी शेअर केले होते. सुश्मिता व ललित मोदींच्या डेटींगची बातमी ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय. 

होय, सुश्मिताला ‘बेटर हाफ’ बनवण्याचं ललित मोदींचं स्वप्न भंगलं आहे. चर्चा खरी मानाल तर ललित मोदी व सुश्मिता यांचं ब्रेकअप झालं आहे.  ललित मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या एका बदलामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना  उधाण आलं आहे.

सुश्मितासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केल्यानंतर मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम बायोमध्ये अभिनेत्रीला आपली ‘बेटरहाफ’ म्हणत एक मोठी पोस्ट लिहिली होती. सोबत डीपीमध्येही सुश्मितासोबतचा फोटो लावला होता. पण आता ललित मोदींनी डीपी व बायोमधून सुश्मिताचं नाव हटवलं आहे. यावरुनच त्या दोघांचं काही तरी बिनसलं असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ललित मोदींनी अचानक त्यांचे प्रोफाईल बदलल्याने त्यांचे ब्रेकअप झालं की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ललित मोदींनी 15 जुलैला सुश्मितासोबतचा फोटो लावला होता. शिवाय बायोमध्ये सुश्मिताला ‘पार्टनर इन क्राईम’ आणि ‘माय लव्ह’ म्हणून संबोधित केलं होतं. पण दीड महिना होत नाही तोच आता ललित मोदींनी प्रोफाईल व इन्स्टा बायोमधून सुश्मितासोबतचा फोटो हटवला आहे. नव्या प्रोफाईलमध्ये आता मोदींनी स्वत:चा हसरा फोटो लावला आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये आयपीएल लिहिलं आहे. बायोमध्ये देखील त्यांनी बदल केला असून आयपीएल फाऊंडर असं लिहिलं आहे.
हा बदल पाहून ललित मोदी व सुश्मिताचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे.
 
सुश्मिाताचाही बदलला अंदाज

सुश्मिताही अलीकडे तिचा एक्स-बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबत फॅमिली पार्टीत  दिसली होती. यावरून सुश्मिता व रोहमनचं पॅचअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तशीही सुश्मिता ललित मोदींसोबतच्या रिलेशनशिपवर काहीही बोललेली नाही.  आता खरं काय, हे सुश्मितालाच ठाऊक़

 

Web Title: Lalit Modi & Sushmita Broke Up IPL Founder Removed Sushmita’s Name & DP From His Instagram