आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ची नेटफ्लिक्सलाही भीती, चित्रपटाला चित्रपटला मोठा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 02:47 PM2022-08-22T14:47:19+5:302022-08-22T19:53:28+5:30

Laal Singh Chaddha :'लाल सिंह चड्ढा'ला घेऊन आमिर खानच्या अडचणी कमी होत नाहीये. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर आता चित्रपटाला आणखी एक दणका मिळाला आहे.

Laal Singh Chaddha OTT release Netflix called off the deal with Aamir Khan film | आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ची नेटफ्लिक्सलाही भीती, चित्रपटाला चित्रपटला मोठा दणका

आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ची नेटफ्लिक्सलाही भीती, चित्रपटाला चित्रपटला मोठा दणका

googlenewsNext

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाला आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर बहिष्काराचा ट्रेंडही पाहायला मिळाला. त्याचाच परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसून आला. बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करु शकला नाही. काहीजण बहिष्काराच्या ट्रेंडला कारण मानत आहेत, तर काहीजण बॉलीवूड चित्रपटांचा कन्टेंटला जबाबदार ठरवत आहेत.हा स्वतंत्र चर्चेचा विषय बनला आहे. आता बातमी अशी येत आहे की, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या खराब प्रदर्शनानंतर आणखी दणका आमिरला बसला आहे. 

'लाल सिंह चड्ढा'बद्दल आमिर खानचा त्रास काही कमी होत नाहीये. बॉक्स ऑफिसवर खराब कामगिरीनंतर आमिर खानला आता 'लाल सिंग चड्ढा'च्या ओटीटी रिलीजवर देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही वर्षांत OTT प्लॅटफॉर्मचा ट्रेंड खूप वाढला आहे. हे पाहता, चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही वेळाने ओटीटीवरही चित्रपट प्रदर्शित केले जातात. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचीही अनेकजण वाट पाहत आहेत. 

आजतकच्या रिपोर्टनुसार 'लाल सिंग चड्ढा'  बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटल्यानंतर नेटफ्लिक्सने आमिरच्या चित्रपटासोबतचा करार रद्द केला आहे. रिपोर्टनुसार आमिर खान आणि वायकॉमला 'लाल सिंग चड्ढा'च्या डिजिटल राईट्सच्या बदल्यात सुमारे 200 कोटी रुपये हवे होते. याशिवाय त्यांनी नेटफ्लिक्सकडे थिएटर आणि ओटीटी रिलीजमध्ये किमान सहा महिन्यांचे अंतर ठेवण्याची मागणी केली होती. मात्र,  बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर नेटफ्लिक्सला 'लाल सिंग चड्ढा'ला खरेदी करण्यात रस नाही. त्यामुळे OTTवर रिलीजचा करार रद्द करण्यात आला आहे.

प्रश्न असा आहे की आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा  बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला असताना, रिलीजच्या इतक्या महिन्यांनंतर हा चित्रपट OTT वर पाहणार कोण आणि का? यामुळेच लाल सिंह चड्ढा यांना OTT प्लॅटफॉर्मसाठी कोणीही खरेदी करण्यास तयार नाही.


 

Web Title: Laal Singh Chaddha OTT release Netflix called off the deal with Aamir Khan film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.