आमिर खान आणि करिना कपूर मुंबईत करणार 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, तयार झाले 2 सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 13:31 IST2020-09-05T13:23:50+5:302020-09-05T13:31:41+5:30

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'च्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

Laal singh chaddha aamir khan kareena kapoor resumes shoot in mumbai | आमिर खान आणि करिना कपूर मुंबईत करणार 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, तयार झाले 2 सेट

आमिर खान आणि करिना कपूर मुंबईत करणार 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, तयार झाले 2 सेट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'च्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट करिना कपूर खान दिसणार आहे. कोरोनामुळे जवळपास पाच महिन्यानंतर आमिरने आपल्या क्रू मेंबर्सच्या सुरक्षेची काळजी घेत सिनेमाची शूटिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तूर्कीतल्या शेड्यूलनंतर तो भारतात परत आला आहे. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, आमिर लवकरच करिना कपूरसोबत मुंबईत शूटिंग सुरु करणार आहे. 

तयार होणार दोन सेट

राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात आमची सहकलाकार असलेली करिना कपूर प्रेग्नेंट आहे त्यामुळे लाल सिंग चड्ढाचा 2 सेट मुंबईत तयार करण्यात येत आहे. आमिर आधी इनडोर शूट करणार आहे. त्यानंतर करिनासोबतच्या शूटिंगसाठी गोरेगावमध्ये दुसरा सेट बनवण्यात येणार आहे. शूटिंग दरम्यान सेटवर मोजकची लोक असतील याची काळजी घेण्यात येणार आहे तसेच यादरम्यान सगळ्यांची सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. 

सिनेमाची कथा
'लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.

'लाल सिंग चड्ढा'मध्ये नाही दिसणार करिना कपूरचे बेबी बम्प, मेकर्सने केला जुगाड
 

Web Title: Laal singh chaddha aamir khan kareena kapoor resumes shoot in mumbai