कुणाल रॉय कपूरने 'या' सिनेमातील गाण्याचे केलं कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 16:56 IST2019-08-09T16:35:49+5:302019-08-09T16:56:54+5:30

बॉलिवूडमधील उभरता गायक वरदान सिंगने आगामी चित्रपट मुश्किलमध्ये पुन्हा आपल्या चाहत्यांना रोमँटिक आवाजात मोहित केले आहे.

Krunal kapoor tallk about this films song | कुणाल रॉय कपूरने 'या' सिनेमातील गाण्याचे केलं कौतूक

कुणाल रॉय कपूरने 'या' सिनेमातील गाण्याचे केलं कौतूक

बॉलिवूडमधील उभरता गायक वरदान सिंगने आगामी चित्रपट मुश्किलमध्ये पुन्हा आपल्या चाहत्यांना रोमँटिक आवाजात मोहित केले आहे. राजीव एस रुईया दिग्दर्शित ‘मुश्किल’ हा चित्रपट हॉरर सस्पेंन्सवर आधारीत असला तरी वरदानच्या जादुई आवाजाने प्रेक्षकांमध्ये रोमँटिक मूड नक्कीच सेट केला आहे.

वरदान सिंगने कुणाल रॉय कपूर आणि नाझिया हुसैन या कलाकारांसाठी ‘यूं ही नहीं’ आणि रजनीश दुग्गल व पूजा बिष्ट या कलाकारांवर चित्रीत झालेलं गाणं "एक सिवा तेरे" गायले आहे. वरदान द्वारा रचित या दोन्ही गाण्यांना सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच चांगला प्रतिसाद मिळतो आहे.  

अभिनेता रजनीश दुग्गलने सांगितलं की, मला गाण्याची रचना आणि सूर खूपच आवडले. मला यापेक्षा आणखी चांगले गाणे सापडेल असे मला वाटत नाही. ‘एक सिवा तेरे’ या गाण्यासाठी शूट करणे माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. 

तर कुणाल रॉय कपूरनेही आपला अनुभव सांगितला. तो म्हणाला की असे सुंदर गाणे अभिनयासाठी मिळाल्याचा मला आनंद वाटतो. मला वरदानचे संगीत आणि गायन शैली खूप आवडली. वरदान सिंग रत्न आहे. मी त्याच्या गाण्यावरुन न्याय देण्याचा प्रयत्न केला. ”

वरदान सिंगने राम गोपाल वर्मा दिग्दर्शित २०१० च्या 'रक्ता चरित्र' या चित्रपटामध्ये आपला आवाज दिला असला तरी या गायकला 'इश्क जुनून' या चित्रपटाच्या 'कभी यूं भी' या ट्रॅकनंतर प्रसिद्धी मिळाली. 
 

Web Title: Krunal kapoor tallk about this films song