The Kapil Sharma Show : म्हणे, कपिल शर्माचा शो पनवती; 'पठाण'च्या यशानंतर अभिनेत्याच्या ट्विटनं चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 10:52 IST2023-02-06T10:52:10+5:302023-02-06T10:52:20+5:30

The Kapil Sharma Show : ‘पठाण’ साठी शाहरूखने ना प्रमोशन केलं, ना मीडियाला मुलाखती दिल्यात. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यासही त्याने नकार दिला. याच पार्श्वभूमीवर एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे...

KRK told Kapil Sharma’s show to be Panauti for films, gave this advice | The Kapil Sharma Show : म्हणे, कपिल शर्माचा शो पनवती; 'पठाण'च्या यशानंतर अभिनेत्याच्या ट्विटनं चर्चांना उधाण!

The Kapil Sharma Show : म्हणे, कपिल शर्माचा शो पनवती; 'पठाण'च्या यशानंतर अभिनेत्याच्या ट्विटनं चर्चांना उधाण!

किंगखान शाहरूख खानच्या ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुखला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत.  चित्रपट प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले असले तरी त्याची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. चित्रपटाने भारतात ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरात ८०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आश्चर्य हे की या चित्रपटासाठी शाहरूखने ना प्रमोशन केलं, ना मीडियाला मुलाखती दिल्यात. अनेक बॉलिवूड स्टार्स नवा चित्रपट म्हटलं की, टीव्ही शोमध्ये प्रमोशन करतात. पण शाहरूखने ते देखील टाळलं. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येण्यासही त्याने नकार दिला. याच पार्श्वभूमीवर एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे.

होय, वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणारा केआरके अर्थात कमाल आर खान (Kamaal Rashid Khan aka KRK ) याने ‘द कपिल शर्मा शो’ला (The Kapil Sharma Show) पनवती म्हटलं आहे. ‘पठाण’ व ‘द काश्मिर फाइल्स’चं उदाहरण देत केआरकेनं एक ट्विट केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

केआरकेचं ट्विट

शाहरूखने कपिल शर्मा शोमध्ये ‘पठाण’चं प्रमोशन केलं नाही आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. कपिलच्या शोमध्ये ‘द काश्मिर फाइल्स’चंही प्रमोशन झालं नाही. तो चित्रपटही सुपरहिट झाला. यावरून हे सिद्ध होतं की, ‘द कपिल शर्मा शो’ बॉलिवूड चित्रपटांसाठी मोठी पनवती आहे. अन्य स्टार्स यातून धडा घेतील, ही अपेक्षा, अशा आशयाचं ट्विट केआरकेनं केलं आहे.

शाहरूखने सांगितलं होतं चित्रपट प्रमोट न करण्याचं कारण...
ट्विटरवर आस्क एसआरके सेशनदरम्यान एका चाहत्याने शाहरूखला चित्रपटाचं प्रमोशन न करण्यामागचं कारण विचारलं होतं. यावर शाहरूखने, ‘मैंने सोचा की शेर इंटरव्यू नहीं करते तो इस बार मैं भी नहीं करुंगा। बस जंगल में आकर देख लो,’असं उत्तर दिलं होतं.
 

Web Title: KRK told Kapil Sharma’s show to be Panauti for films, gave this advice