Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:24 AM2022-11-27T10:24:03+5:302022-11-27T10:24:43+5:30

होय, क्रिती सॅनन (Kriti Sanon ) सध्या ‘आदिपुरूष’ फेम प्रभासला (Prabhas) डेट करत असल्याचं मानलं जात आहे. अद्याप प्रभास व क्रितीने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण हो, चर्चा जोरात आहेत...

kriti sanon says she would marry adipurush co-star prabhas | Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली?

Kriti Sanon : क्रिती सॅनन बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’? बघा तर अभिनेत्री काय म्हणाली?

googlenewsNext

क्रिती सॅननचा (Kriti Sanon ) ‘भेडिया’ (Bhediya) हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज झाला आहे आणि रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. याचदरम्यान क्रितीच्या लग्नाच्या चर्चाही जोरात सुरू झाल्या आहेत. होय, क्रिती सध्या ‘आदिपुरूष’ फेम प्रभासला (Prabhas) डेट करत असल्याचं मानलं जात आहे. अद्याप प्रभास व क्रितीने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण हो, चर्चा जोरात आहेत. अशात आता क्रितीने लग्नाचे संकेत दिले आहेत.
 ‘भेडिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान क्रितीने एक मुलाखत दिली. सध्या या मुलाखतीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने प्रभाससोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन व प्रभास या तिघांपैकी कुणाशी फ्लर्ट करशील? कुणाला डेट करशील आणि कुणाशी लग्न करशील? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर मी कार्तिकसोबत फ्लर्ट करेल, टायगरला डेट करेल आणि लग्न प्रभासशी करेल, असं उत्तर क्रितीने दिलं. तिच्या या वक्तव्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. प्रभास आणि मी आम्ही दोघं ऑनस्क्रीन खूप चांगले दिसतो, असंही क्रिती म्हणाली.

अलीकडे एका मुलाखतीत वरूध धवनने क्रितीच्या लव्ह लाईफबद्दल एक हिंट दिली होती. ती एका टॉल ‘शहजादा’ला डेट करत असल्याचं वरूणने म्हटलं होतं.   हा शहजादा दुसरा कुणी नसून प्रभास असल्याचं मानलं जात आहे.
‘आदिपुरूष’ या आगामी सिनेमात प्रभास व क्रिती दोघंही एकत्र दिसणार आहेत. चर्चा खरी मानाल तर याच चित्रपटाच्या सेटवर क्रिती व प्रभास यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. सध्या क्रिती जिथे जाईल तिथे प्रभासबद्दल बोलताना दिसतेय. ‘आदिपुरूष’च्या शूटिंगच्या वेळी प्रभासने मलाा तेलगू डायलॉग शिकवले आणि मी त्याला हिंदी शिकवलं, असं क्रिती म्हणाली होती.  

 प्रभास आणि क्रितीचा‘आदिपुरूष’ हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यात या दोघांव्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा ओम राऊत याने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 16 जून 2013 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: kriti sanon says she would marry adipurush co-star prabhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.