दिल्लीच्या प्रदूषणावर क्रिती सनॉनची प्रतिक्रिया, म्हणाली "दिवसेंदिवस अधिकच वाईट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:43 IST2025-11-24T13:43:07+5:302025-11-24T13:43:45+5:30

पत्रकार परिषदेत क्रिती सनॉनने दिल्लीतील बिघडलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.

Kriti Sanon Reacts To Pollution In Delhi Admits It Is Getting Worse | दिल्लीच्या प्रदूषणावर क्रिती सनॉनची प्रतिक्रिया, म्हणाली "दिवसेंदिवस अधिकच वाईट..."

दिल्लीच्या प्रदूषणावर क्रिती सनॉनची प्रतिक्रिया, म्हणाली "दिवसेंदिवस अधिकच वाईट..."

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन सध्या तिच्या आगामी 'तेरे इश्क में' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात क्रिती आणि सूपरस्टार धनुष यांनी स्क्रीन शेअर केली आहे. सध्या  क्रिती आणि धनुष हे चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतंच त्यांनी दिल्लीत चित्रपटाचं प्रमोशन केलं.  या कार्यक्रमात चित्रपटापेक्षा राजधानी दिल्लीतील धोकादायक पातळीवर पोहोचलेल्या प्रदूषणावर अधिक चर्चा झाली. पत्रकार परिषदेत क्रिती सनॉनने दिल्लीतील बिघडलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. स्वतः दिल्लीची रहिवासी असल्यामुळे क्रितीनं शहराची बिकट होत चाललेली परिस्थिती पाहून प्रशासनाला त्वरित आणि ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले.

'तेरे इश्क में' या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबद्दल क्रिती म्हणाली, "मला वाटत नाही की काहीही बोलून काही फायदा होईल. प्रदूषण दिवसेंदिवस अधिकच वाईट होत चालले आहे. मी दिल्लीची आहे आणि मला माहित आहे की आधी परिस्थिती कशी होती.  आता ती आणखीच बिकट होत चालली आहे. हे थांबवण्यासाठी काहीतरी करायलाच हवे, नाहीतर असा टप्पा येईल की आपण एकमेकांच्या अगदी शेजारी उभे राहिलो तरी दिसणारही नाही".

दिल्लीतील प्रदूषण सध्या धोकादायक पातळीवर आहे. हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक बनले आहे.  AQI.in या खाजगी ट्रॅकरनुसार रविवारी दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी प्रचंड धुक्याचे वातावरण होते आणि एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) तब्बल ५५९ नोंदवला गेला. भारत सरकार (CPCB) नुसार, भारतीय AQI श्रेणी ०-५०० आहे, ० वरून चांगली आणि ५०० ​​गंभीर आहे. शून्य ते ५० असा ‘एक्यूआय’ हा चांगला मानला जातो. ५१ ते १०० म्हणजे मध्यम प्रदूषण, १०१ ते २०० म्हणजे वाईट, २०१ ते ३०० म्हणजे अनारोग्यदायी पातळीपर्यंत पोहोचलेले प्रदूषण, ३०१ ते ४०० म्हणजे अतिशय तीव्र प्रदूषण, तर ४०१ ते ५०० म्हणजे अतिधोकादायक प्रदूषण असल्याचे मानले जाते. 

Web Title : दिल्ली के प्रदूषण पर कृति सैनन की प्रतिक्रिया: 'दिन ब दिन बदतर'

Web Summary : कृति सैनन ने अपनी फिल्म 'तेरे इश्क में' के प्रमोशन के दौरान दिल्ली के बढ़ते प्रदूषण पर चिंता जताई। दिल्ली निवासी होने के नाते, उन्होंने तत्काल कार्रवाई का आग्रह किया, उन्हें डर है कि खतरनाक वायु गुणवत्ता के कारण भविष्य में दृश्यता कम हो जाएगी।

Web Title : Kriti Sanon Reacts to Delhi Pollution: 'Getting Worse Day by Day'

Web Summary : Kriti Sanon, promoting her film 'Tere Ishk Mein,' expressed serious concerns about Delhi's worsening pollution. As a Delhi resident, she urged immediate action, fearing a future where visibility diminishes drastically due to the hazardous air quality.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.