ओळखलं का? लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं मुंबईच्या रस्त्यांवर लुटला बाईक राईडचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:01 IST2026-03-13T10:02:23+5:302026-03-13T12:01:21+5:30

लक्झरी कार सोडून अभिनेत्रीची बाईक राईड, शूटिंगनंतर ट्रॅफिक टाळण्यासाठी केला 'जुगाड'

Kriti Sanon Bike Ride To Beat Mumbai Traffic After Shoot Video Viral | ओळखलं का? लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं मुंबईच्या रस्त्यांवर लुटला बाईक राईडचा आनंद

ओळखलं का? लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीनं मुंबईच्या रस्त्यांवर लुटला बाईक राईडचा आनंद

बोलके डोळे आणि मोहक हास्याने अनेक सिनेरसिकांना क्लीन बोल्ड करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सनॉन. आपल्या अभिनयाच्या जादूने तिने चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं. 'हिरोपंती' या सिनेमातून तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. सध्याच्या घडीला क्रिती  तिच्या आगामी 'कॉकटेल २' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहे. मात्र, रात्री उशिरा शूटिंग संपल्यानंतर मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी क्रिती ने चक्क एक आगळीवेगळी शक्कल लढवली. आपली लक्झरी कार बाजूला ठेवून क्रिती ने चक्क बाईकवरून घर गाठले. तिचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

क्रितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक छोटा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिचे सामान पॅक करून शूटिंग लोकेशनवरून बाहेर पडताना दिसत आहे. मुंबईचा ट्रॅफिक टाळण्यासाठी तिने बाईकचा पर्याय निवडला. प्रवासादरम्यान लोकांची गर्दी टाळण्यासाठी आणि ओळख पटू नये म्हणून तिने हेल्मेटसोबत काळा मास्क देखील घातला होता. रात्रीच्या थंड वाऱ्याचा आनंद घेताना ती दिसली. हा व्हिडीओ शेअर करताना क्रितीने अतिशय मजेशीर कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले, "शूटिंगनंतर ट्रॅफिक टाळण्याचा माझा आवडता मार्ग". 


'कॉकटेल २' आणि रश्मिकाच्या लग्नाची चर्चा
क्रिती लवकरच 'कॉकटेल २' या रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटात क्रितीसोबत शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्याही मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे, नुकतीच क्रितीने हैदराबादमध्ये रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Web Title : कृति सैनन ने ट्रैफिक से बचने के लिए मुंबई में बाइक की सवारी का आनंद लिया।

Web Summary : कृति सैनन, 'कॉकटेल 2' की शूटिंग करते हुए, देर रात की शूटिंग के बाद बाइक चलाकर मुंबई के ट्रैफिक से बच गईं। उन्होंने हेलमेट पहनकर सवारी का एक वीडियो साझा किया, जिसमें इसे ट्रैफिक से बचने का उनका पसंदीदा तरीका बताया गया। वह हाल ही में रश्मिका मंदाना के शादी के रिसेप्शन में थीं।

Web Title : Kriti Sanon enjoys Mumbai bike ride to beat traffic.

Web Summary : Kriti Sanon, filming 'Cocktail 2,' bypassed Mumbai traffic by riding a bike after a late shoot. She shared a video of her helmeted ride, calling it her favorite way to dodge traffic. She was recently at Rashmika Mandanna's wedding reception.