क्रिती सॅनन म्हणते, नवरा असावा तर असा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 15:32 IST2018-09-28T15:27:34+5:302018-09-28T15:32:54+5:30

क्रिती सॅनन सध्या तिच्या आगामी सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. येत्या वर्षात  क्रितीचे तब्बल चार सिनेमा रिलीज होणार आहेत. अर्जुन पटियाला, हाऊसफुल 4, लुका छुप्पी आणि आशुतोष गोवारिकरच्या 'पानीपत'चा समावेश आहे.  

 Kriti Sanan told about her husband expectation | क्रिती सॅनन म्हणते, नवरा असावा तर असा

क्रिती सॅनन म्हणते, नवरा असावा तर असा

ठळक मुद्देनुकतीच क्रिती एका टॉक शोमध्ये आली होतीयावेळी तिने वैयक्तिक आयुष्याशी संबंधीत अनेक खुलासे केले

क्रिती सॅनन सध्या तिच्या आगामी सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. येत्या वर्षात  क्रितीचे तब्बल चार सिनेमा रिलीज होणार आहेत. अर्जुन पटियाला, हाऊसफुल 4, लुका छुप्पी आणि आशुतोष गोवारिकरच्या 'पानीपत'चा समावेश आहे.  

नुकतीच क्रिती एका टॉक शोमध्ये आली होती याठिकाणी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक खुलासे केले. ज्यावेळी तिला तिचा 'आयडिल मॅन'बाबत विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले, त्याचा सेन्स ऑफ ह्रूमर चांगला पाहिजे, तसेच तो चांगला बोलणारा हवा. प्रामाणिक आणि लॉयल हवा आणि जास्त उंच हवा. 

क्रितीच्या लिस्ट तर तशी खूप मोठी आहे. तिचे काही महिन्यांपूर्वी सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाले होते. नुकतेच क्रितीने 'लुका-छिपी'चे शूटिंग पूर्ण केले आहे. दिनेश विजन यांच्या आगामी सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 'लुका-छिपी'चे शूटिंग ग्वालियर, मथुरा आणि आग्रामध्ये करण्यात आले आहे. यात कार्तिक एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. यासिनेमात दोघे ही प्रादेशिक भाषा बोलताना दिसणार आहेत. तसेच क्रिती ‘अर्जुन पटियाला’ या सिनेमात दिलजीत दोसांझसोबत बघावयास मिळणार आहे. रिपोर्टनुसार, सिनेमात क्रिती एका पत्रकाराच्या भूमिकेत असून, दिलजीत एका लहान शहरातील तरुणाची भूमिका साकारत आहे. 
 

Web Title:  Kriti Sanan told about her husband expectation