क्रिती खरबंदा धर्मेंद्र यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 17:07 IST2018-08-09T17:06:51+5:302018-08-09T17:07:56+5:30
क्रितीने 'यमला पगला दीवाना फिर से' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान धर्मेंद्र यांच्यासोबत बराच वेळ व्यतित केला आहे.

क्रिती खरबंदा धर्मेंद्र यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी उत्सुक
अभिनेत्री क्रिती खरबंदा 'यमला पगला दिवाना' सिनेमाच्या पुढील भाग यमला पगला दीवाना फिर सेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती बॉबी देओलसोबत रोमांस करताना दिसणार आहे. ती ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी खूप उत्सुक आहे.
क्रितीने 'यमला पगला दीवाना फिर से' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान धर्मेंद्र यांच्यासोबत बराच वेळ व्यतित केला आहे. तसेच तिने त्यांना बुमरँग व्हिडिओ आणि सोशल मीडियावर फोटो शेअर कसे करायचे हे शिकवले. तसेच या चित्रपटात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा केमिओ करताना दिसणार आहे. त्यामुळे दोन दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळाल्यामुळे ती खूप खूश आहे. धर्मेंद्र व शत्रुघ्न यांचा १९७४ साली प्रदर्शित झालेला दोस्त चित्रपट तिला खूप आवडत असल्याचे तिने सांगितले.
'यमला पगला दिवाना फिर से' हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा असल्याचे बोलले जात आहे. मागील दोन भागांप्रमाणेच बॉबी देओल आणि सनी देओल भाऊ म्हणूनच या सिनेमातही व्यक्तिरेखा साकारतील. कृति चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर धर्मेंद्र यांची भूमिका प्रेक्षकांसाठी सरप्राईज असून या नवीन भागात ते वकिलाच्या भूमिकेत दिसतील.
'यमला पगला दीवाना फिर से' चित्रपट आधी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण, त्याच दिवशी अक्षय कुमारचा गोल्ड व जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' देखील प्रदर्शित होणार होता. बॉक्स ऑफिसवरील क्लॅशपासून बचाव करण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. 'यमला पगला दिवाना फिर से' हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.