'कॉफी विद करण' मध्ये 'सिंघम'ची एन्ट्री, रोहित शेट्टीनेही केली धमाल; प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 02:11 PM2023-12-18T14:11:37+5:302023-12-18T14:14:31+5:30

बॉलिवूडमधला तुझा दुश्मन कोण यावर अजय देवगणने कोणाचं नाव घेतलंय बघा.

Koffee with Karan upcoming episode singham ajay devgn and Rohit Shetty promo | 'कॉफी विद करण' मध्ये 'सिंघम'ची एन्ट्री, रोहित शेट्टीनेही केली धमाल; प्रोमो व्हायरल

'कॉफी विद करण' मध्ये 'सिंघम'ची एन्ट्री, रोहित शेट्टीनेही केली धमाल; प्रोमो व्हायरल

'कॉफी विद करण' च्या(Koffee With Karan)  सिझन 8 च्या आगामी एपिसोडमध्ये 'सिंघम' अजय देवगण (Ajay Devgn) आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हे दोघं धमाल करणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला असून काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन्ही स्टार बॉलिवूड आणि वैयक्तिक आयुष्याविषयी दिलखुलासपणे बोलताना दिसत आहेत. रोहित शेट्टीने रणवीर सिंहची चांगलीच चेष्टा केली आहे. तर बॉलिवूडमधला तुझा दुश्मन कोण यावर अजय देवगणने कोणाचं नाव घेतलंय बघा.

प्रोमोच्या सुरुवातीलाच करण जोहर विचारतो, 'तुम्ही यश मिळाल्यावर कसे रिअॅक्ट करता?' यावर रोहित शेट्टी म्हणतो, 'मी अजय आणि सलमान खानला पाहिले आहे. जर सिनेमा सुपरहिट झाला तर दोघं आरामात व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन चिल करतात. जर सिनेमा फ्लॉप झाला तरी दोघं आरामात व्हॅनमध्ये चिल करतात.' यावर सगळेच हसतात. दरम्यान करण जोहर अजयला रॅपिड फायरमध्ये विचारतो की,'तुझा कधी बॉलिवूडमध्ये कोणी दुश्मन होता का?' यावर अजय म्हणतो, 'तूच होतास एकेकाळी'. हे ऐकल्यावर करण जोहरही शॉक होऊन बघतो तर रोहित शेट्टी जोरजोरात हसतो.

कॉफी विद करणच्या या एपिसोडची चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. अजय देवगण शांत राहून एकाच वाक्यात समोरच्याची बोलती बंद करतो. त्याचा हा अंदाज चाहत्यांना नेहमीच आवडतो. तर रोहित शेट्टी कॉमेडी करण्यात पटाईत आहेच. करण जोहरसोबच केलेल्या या चॅटिंगची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: Koffee with Karan upcoming episode singham ajay devgn and Rohit Shetty promo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.