Koffee With Karan 8: करण जोहरच्या शोमध्ये येणार सारा अली खान-अनन्या पांडे, उघड करणार एकमेकांचे सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 11:58 AM2023-11-03T11:58:10+5:302023-11-03T11:59:10+5:30

Koffee With Karan 8: करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोच्या तिसऱ्या पर्वाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोच्या तिसऱ्या पर्वात बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री दिसणार आहेत.

Koffee With Karan 8: Sara Ali Khan-Ananya Pandey to appear on Karan Johar's show, reveal each other's secrets | Koffee With Karan 8: करण जोहरच्या शोमध्ये येणार सारा अली खान-अनन्या पांडे, उघड करणार एकमेकांचे सीक्रेट

Koffee With Karan 8: करण जोहरच्या शोमध्ये येणार सारा अली खान-अनन्या पांडे, उघड करणार एकमेकांचे सीक्रेट

करण जोहर (Karan Johar) त्याच्या कॉफी विथ करणच्या चॅट शोच्या ८(Koffee With Karan 8)व्या सीझनसह परतला आहे. शोचा पहिला आणि दुसरा भाग जबरदस्त होता. पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग आले होते, तर देओल बंधू सनी आणि बॉबी दुसऱ्या एपिसोडमध्ये आले होते. प्रत्येक आठवड्यात चाहते पुढील एपिसोडमध्ये कोणत्या सेलेब्सला भेटतील हे जाणून घेण्याची प्रतीक्षा करतात. करण जोहर सेलिब्रिटींना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारतो. या शोमध्ये सेलेब्सबद्दल अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. कॉफी विथ करण ८ च्या तिसऱ्या पर्वात बॉलिवूडच्या दोन सुंदरी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) दिसणार आहेत.

झूमच्या रिपोर्टनुसार, या शोमध्ये सारा आणि अनन्याची वेगळी स्टाइल पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनच्या तुलनेत दोघेही खूप मस्ती करताना दिसणार आहेत. करण जोहरही या दोघांना रंजक प्रश्न विचारताना दिसणार आहे. सारा अली खान पहिल्यांदाच नाही तर तिसऱ्यांदा करणच्या शोमध्ये येणार आहे. कॉफी विथ करणमधून त्याने वडील सैफ अली खानसोबत डेब्यू केला होता. त्यावेळी साराचा केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यानंतर सारा जान्हवी कपूरसोबत सीझन ७ मध्ये आली होती. आता सारा ८व्या सीझनमध्ये अनन्या पांडेसोबत दिसणार आहे.

अनन्या पांडे तिसऱ्यांदा येणार शोमध्ये

अनन्या पांडेबद्दल सांगायचे तर ती देखील तिसऱ्यांदा शोमध्ये येणार आहे. सर्वप्रथम, अनन्या तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफसोबत तिचा पहिला चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर २ च्या रिलीजच्या वेळी आली होती. सातव्या सीझनमध्ये, अनन्या तिचा लीगर को-स्टार विजय देवरकोंडासोबत शोमध्ये आली होती. आता अनन्या बॉलिवूडची ब्युटी सारासोबत मस्ती करताना दिसणार आहे.
 

Web Title: Koffee With Karan 8: Sara Ali Khan-Ananya Pandey to appear on Karan Johar's show, reveal each other's secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.