Koffee With Karan 8 : करण आणि काजोलच्या मैत्रीत या कारणांमुळे आला दुरावा, दिग्दर्शकाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:28 PM2023-11-08T16:28:00+5:302023-11-08T16:29:09+5:30

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण सीझन ८' च्या एका एपिसोडमध्ये, करण जोहरने करीना कपूर (Kareena Kapoor) आणि काजोल(Kajol)सोबतच्या त्याच्या मैत्रीबद्दल खुलासा केला.

Koffee With Karan 8: Karan and Kajol's friendship split due to these reasons, reveals director | Koffee With Karan 8 : करण आणि काजोलच्या मैत्रीत या कारणांमुळे आला दुरावा, दिग्दर्शकाने केला खुलासा

Koffee With Karan 8 : करण आणि काजोलच्या मैत्रीत या कारणांमुळे आला दुरावा, दिग्दर्शकाने केला खुलासा

करण जोहर (Karan Johar)चा रिएलिटी चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ८'(Koffee With Karan 8)मुळे चर्चेत आहे. या चॅट शोमध्ये करण जोहर पाहुण्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी उघड करताना दिसत आहे. त्याच वेळी, करणही त्याच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करण्यात मागे राहत नाहीत. अलीकडेच, 'कॉफी विथ करण सीझन ८' च्या एका एपिसोडमध्ये, करण जोहरने करीना कपूर (Kareena Kapoor) आणि काजोल(Kajol)सोबतच्या त्याच्या मैत्रीबद्दल खुलासा केला.

'कॉफी विथ करण सीझन ८' मध्ये करण जोहरने खुलासा केला होता की, कल हो ना हो चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्याच्यात वाद झाला होता. तो म्हणाला, 'मी करिनाला कल हो ना हो चित्रपटाची ऑफर दिली होती, पण तिने नकार दिला. काही काळानंतर, जेव्हा मला माझे वडील यश जोहर यांच्या निधनाची माहिती मिळाली, तेव्हा करीनाने मला फोन केला आणि माझ्याशी बोलली. त्यांची मैत्री पुन्हा तशीच झाली.

काजोलसोबतच्या वादावर करण म्हणाला...
काजोलसोबतच्या वादाबाबत करण जोहरने सांगितले की, जेव्हा अजय देवगण दिग्दर्शित 'शिवाय' आणि 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटांमध्ये भांडण झाले तेव्हा करणचा काजोलसोबत वाद झाला. जवळपास दोन वर्षे ते एकमेकांशी बोलले नाहीत. जेव्हा करणची मुले यश आणि रुही यांचा जन्म झाला तेव्हा त्याने त्यांचे फोटो अभिनेत्रीला पाठवली आणि तिला सांगितले, 'तुला उत्तर देण्याची गरज नाही, पण माझी मुले अगदी तुझ्यासारखी दिसतात.' काजोलने उत्तर दिले, 'मुलांना पाहून मला खूप आनंद झाला.'

अॅक्शन चित्रपटाचे करणार दिग्दर्शन 
करण जोहरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग आणि आलिया भट अभिनीत चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या यशामुळे चर्चेत आहे. नुकतेच, करणने घोषणा केली होती की तो 'रॉकी और रानी' नंतर एक अॅक्शन चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. मात्र, त्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अपडेट शेअर केलेली नाही.

Web Title: Koffee With Karan 8: Karan and Kajol's friendship split due to these reasons, reveals director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.